Coronavirus : शंका आल्यास उपचार घ्या; तुम्ही बरे व्हाल!, दिल्लीतील पहिल्या पेशंटचे अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:52 AM2020-03-18T06:52:52+5:302020-03-18T06:53:15+5:30

तुम्हाला जर काही लक्षणं जाणवू लागली तर तत्काळ डॉक्टरांना भेटा आणि उपचार घ्या. तुम्ही नक्की बरे व्हाल... हा सल्ला दिला आहे देशात सर्वप्रथम कोरोनाची लागण झालेल्या आणि त्यातून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीने.

Coronavirus: seek treatment if in doubt; You'll be fine !, The first Patient Experience in Delhi | Coronavirus : शंका आल्यास उपचार घ्या; तुम्ही बरे व्हाल!, दिल्लीतील पहिल्या पेशंटचे अनुभव

Coronavirus : शंका आल्यास उपचार घ्या; तुम्ही बरे व्हाल!, दिल्लीतील पहिल्या पेशंटचे अनुभव

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविषयी जराही घाबरू नका. तुम्हाला जर काही लक्षणं जाणवू लागली तर तत्काळ डॉक्टरांना भेटा आणि उपचार घ्या. तुम्ही नक्की बरे व्हाल... हा सल्ला दिला आहे देशात सर्वप्रथम कोरोनाची लागण झालेल्या आणि त्यातून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीने.
पूर्व दिल्लीतील मयूर विहार परिसरात राहणारी ही व्यक्ती चामडे व्यावसायिक आहे. इटलीतील मिलान येथे झालेल्या चामडे प्रदर्शनासाठी ते गेले होते. तेथून आल्यानंतर मुलाचा वाढदिवस त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा केला. त्या रात्रीच त्यांना ताप आला. त्यानंतर ते आरएमएल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले.
कोरोनाची तपासणी सकारात्मक आल्यानंतर त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये १४ दिवस उपचारार्थ स्वतंत्र ठेवण्यात आले. शनिवारी त्यांना घरी पाठविण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून घरातील एका रुममध्ये त्यांना १४ दिवस स्वतंत्र राहण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या अनुभवाबद्दल ते सांगतात, ती काही काळी कोठडी नव्हती. ती स्वतंत्र खोली होती. तेथे एसी पण होता. खिडकीतून मुबल सूर्यप्रकाशही यायचा. डॉक्टर, नर्स आणि तेथील कर्मचाऱ्यांनी माझी उत्तम काळजी घेतली. लक्षणे दिसत असतील तर घरी बसू नका. तात्काळ डॉक्टरांना भेटा. दोन मुले, पत्नी आणि आईसह मी सध्या सुखरूप आहे.

पुस्तके वाचली
1हॉस्पिटलमध्ये असताना माझ्याकडे मोबाइल होता.
त्यामुळे कुटुंबीयांशी व्हिडिओ करून गप्पा मारायचो. तेथे मी अनेक पुस्तके वाचली. अनेक व्हिडिओज आणि वेब सीरिजही पाहिल्या. त्यामुळे मला वेगळे काही वाटले नाही. मला भजन ऐकायला आवडते. आताही दिवसातून दोनदा प्राणायाम करीत आहे.
2आता मी अधिक धार्मिक
झालो आहे, असे ते सांगतात. हॉस्पिटलमध्ये खूप स्वच्छता होती. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे माझ्या तब्ब्येतीची चौकशी केली आणि मला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, ही घटना माझ्यासाठी मोठी होती, असे ते म्हणाले.

Web Title: Coronavirus: seek treatment if in doubt; You'll be fine !, The first Patient Experience in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.