Coronavirus : ...म्हणून 2 हजार गावकऱ्यांनी बंद केलं एक वेळचं जेवण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 09:23 PM2020-04-09T21:23:27+5:302020-04-09T21:41:15+5:30

Coronavirus : कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ती 5000 वर पोहोचली आहे. तर 150 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

coronavirus two thousand people gave up one time meal in kathuwa SSS | Coronavirus : ...म्हणून 2 हजार गावकऱ्यांनी बंद केलं एक वेळचं जेवण 

Coronavirus : ...म्हणून 2 हजार गावकऱ्यांनी बंद केलं एक वेळचं जेवण 

Next

कठुआ - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ती 5000 वर पोहोचली आहे. तर 150 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. तसेच कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी डॉक्टरही आपल्या जीवाची पर्वा न करता तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. गरजूंना मदत करता यावी यासाठी एका गावातील दोन हजार गावकऱ्यांनी एक वेळचं जेवण बंद केलं आहे. 

कोरोनाच्या या लढाईत जम्मूमधील एका गावाने सर्वांसमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे कामधंदे बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. अनेकांना एक वेळचं जेवण मिळत नाही. त्यामुळेच कठुआतील एका गावातील जवळपास दोन हजार गावकऱ्यांनी गरजूंना मदत करता यावी यासाठी एक वेळ जेवायचं नाही असा निर्णय घेतला आहे. कठुआ जिल्ह्यातील बोरथॅन नॉर्थ पंचायतीने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. यानुसार गावातील गर्भवती महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलं वगळता सर्व लोकांनी एक वेळ जेवायचं नाही. 

बोरथॅन नॉर्थ पंचायतीच्या सदस्यांनी प्रस्ताव मंजूर करताना पूर्ण लॉकडाऊन पाळण्याचा देखील निश्चय केला आहे. यासाठी प्रभागानुसार यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ग्रामीण भागात शेतीतलं पीक काढण्यासाठी लोक एकमेकांना मदत करतील. सरपंच शिव देव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील सदस्यांची सोशल डिस्टन्सिंगबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये सदस्य आणि गावकऱ्यांच्या संमतीने अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

कोरोनाचा सामना करताना ग्रामपंचायतीला सरकारवर कोणताही ताण येऊ द्यायचा नाही. यासाठी गावकऱ्यांनी त्यांचे धान्य गरजेपुरते वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गर्भवती महिला, वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुलं यांच्या व्यतिरिक्त इतर लोक एक वेळचं जेवण सोडणार आहेत. गावातील 80 टक्के लोक शेती करतात. त्या लोकांचे एक वेळचे धान्यही वाचेल आणि सरकारकडून अतिरिक्त मदत लागणार नाही. गावातील दोन हजार लोक यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनापासून शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल, पाहून वाटेल नवल

Coronavirus : कोरोनामुळे परिस्थिती गंभीर! अमेरिकेत 11 भारतीयांचा मृत्यू, 16 जणांना लागण

Coronavirus : कोरोनाचा धसका! अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन

Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज अन्...

Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या 

Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार

 

Web Title: coronavirus two thousand people gave up one time meal in kathuwa SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.