CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या २३ हजार ५२९ कोरोनाबाधितांची नोंद; ३११ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:13 AM2021-09-30T11:13:37+5:302021-09-30T11:14:18+5:30
आतापर्यंत एकूण ३,३०,१४,८९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात २३,५२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत २८,७१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,३०,१४,८९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
India reports 23,529 new #COVID19 cases, 28,718 recoveries and 311 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) September 30, 2021
Active cases: 2,77,020
Total cases: 3,37,39,980
Total recoveries: 3,30,14,898
Death toll: 4,48,062
Total vaccination: 88,34,70,578 (65,34,306 in last 24 hrs) pic.twitter.com/BVeocY7t4j
देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये अर्ध्याहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्या आधी मंगळवारी देशात १८ हजार ८७० नव्या रुग्णांची नोंद झाली होती तर ३७८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून बुधवारी १२ हजार १६१ रुग्णांची भर पडली तर १५५ जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये काल १७ हजार ८६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात काल ३ हजार २५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६८ हजार ५३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के आहे.