n प्रश्न - लान्सेटच्या अभ्यासात हवेत कोरोना विषाणू असल्याचे म्हटले आहे. तो किती धोकादायक आहे व त्यापासून संरक्षण काय?n उत्तर : अनेक प्रकारच्या संशोधनात सहा-सात महिन्यांपूर्वीच वैज्ञानिकांनी याला पुष्टी दिली होती. आम्हीही म्हणत आहोत की, विषाणू हवेत आहे आणि सोबत कोरोनाचा फैलाव ड्राॅपलेटतूनही होतो आहे. ड्रॉपलेट सहा फूट अंतरावर खोकलल्यामुळे पसरतात. हवेतून कोरोना विषाणू त्यापेक्षाही सूक्ष्म आहे व तो हवेत खूप वेळ फिरत असतो. याचा अर्थ कोरोनाबाधित व्यक्ती त्याच्या खोलीत शिंकतो तेव्हा हवेत असलेले कोरोना विषाणू इतर लोकांनाही संक्रमित करतील. संक्रमण टाळायचे असेल तर कार्यालय आणि घरातही मास्क वापरावा.
n प्रश्न : व्यक्ती एकटीच असेल तरी मास्क वापरावा का?n उत्तर - घरी तुम्ही एकटेच असाल तर मास्क वापरणे गरजेचे नाही. मात्र घरात हवा खेळती असावी. घर आणि कार्यालयाच्या खिडक्या उघड्या ठेवा.
n प्रश्न : हवेतून संक्रमण पाहता सिंगल मास्कऐवजी डबल मास्क वापरणे किती योग्य आहे?n उत्तर : जर आम्ही एन-९५ मास्क वापरत असू (जो डॉक्टर वापरतात) तर आमचे काम सिंगल मास्कनेही होईल. मास्क नाक आणि तोंडावर योग्यरीत्या बसलेला असणे गरजेचे आहे.
n प्रश्न : कोरोनाची प्रचंड बाधा होणार (पीक) आहे का?n उत्तर : आता ती अवस्था (पीक) नाही. परंतु, संक्रमणाची दुसरी लाट खूप धोकादायक आहे.n प्रश्न : दुसऱ्या लाटेत घट कधी बघायला मिळेल?n उत्तर : तीन आठवडे लागू शकतात. कारण राज्यांनी ज्या कठोरपणे लॉकडाऊन लागू केला त्यामुळे कोविड अनुकूल व्यवहार करणे लोकांना भाग पडले. गेल्या वर्षीच्या तुलनेत आज लोक घराबाहेर जास्त आहेत. म्हणून जास्त बाधित होत आहेत.
n प्रश्न : रुग्णालयांत खाटांची टंचाई असल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे की घरी राहावे हे कसे ठरवायचे?n उत्तर : देशात ८५ ते ९० टक्के लोकांमध्ये सौम्य संक्रमण होते. १० ते १५ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल होणे गरजेचे असते. घरी राहणार असाल तर तेथे स्वतंत्र खोली, त्याला जोडून संडास-बाथरूम हवे. तुमचा ऑक्सिजन ९० टक्क्यांच्या कमी असेल आणि औषधे घेतल्यानंतरही ताप कमी झाला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
n प्रश्न : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्सिजनची गरज जास्त का?n उत्तर : यंदा रुग्ण तीन पट वाढले आहेत. त्यामुळे मागणीही तशी वाढली आहे. रुग्णालयांत ना खाटा ना अतिदक्षता विभाग. म्हणून रुग्णसंख्या कमी होणे गरजेचे आहे.
n प्रश्न : रेमडेसिविर आणि प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचारात किती परिणामकारक आहे?n उत्तर : दोन्ही उपचार फार परिणामकारक नाहीत, असे वर्षभर झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यातून मृत्युदर कमी होतो ना कोणाचा जीव वाचतो. रेमडेसिविरवर मोठा अभ्यास झाला आहे. डब्ल्यूएचओच्या रिकव्हरी ट्रायलमध्ये निगेटिव्ह परिणाम समोर आले. त्यात रेमडेसिविर जीव वाचवतो, असे दिसले नाही. आम्ही बऱ्याच प्लाझ्मा बँक सुरू केल्या. आयसीएमआरनेही अभ्यास केला. त्यात प्लाझ्मा फार परिणामकारक म्हटले नाही.
n प्रश्न : १ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे. राज्यांत लस टंचाई असताना परिस्थिती कशी हाताळणार?n उत्तर : या स्थितीला तोंड देण्यासाठी विदेशी कंपन्यांच्या ज्या लसींना अमेरिका, युरोप, जपान किंवा डब्ल्यूएचओची मंजुरी आहे त्यांच्याबद्दल नियामक संस्था (डीजीसीआय) लवकर निर्णय घेईल, असे ठरले. नुकतीच स्पुटनिक-V ला तातडीची मंजुरी दिली गेली. यामुळे नवी लस मिळून लसीचा साठा वाढेल.
n प्रश्न : मागच्या अनुभवावरून आम्ही आमच्याकडे कोरोनावरील उपचार आहे, असे म्हणू शकतो का?n उत्तर : आम्ही लस बनवली असे म्हणू शकतो. परंतु, आम्ही विषाणूविरोधी औषध बनवू शकलो नाही. आमच्याकडे रेमडेसिविर, आईवरवैक्टिन, एचसीक्यू असले तरी असे कोणतेही औषध नाही की ते घेतले व विषाणू नष्ट झाला.
योग्य वेळी उपचार महत्त्वाचेजर तुमची प्राणवायूची पातळी ९४ टक्क्यांच्या वर असेल तर काही अडचण नाही; परंतु जर ती व्यायामानंतर खाली येत असेल तर तुम्ही डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी तुम्ही योग्य उपचार घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. -डॉ. देवी शेट्टी, अध्यक्ष, नारायणा हेल्थ
...तर प्राणवायू आज पुरेसा आहेन्याय्यरीतीने जर आम्ही आज प्राणवायू वापरणार असू तर तो पुरेसा आहे. तुम्हाला प्राणवायूची गरज नाही तर तुम्ही तो वापरू नका, हे लोकांना मला सांगायचे आहे. प्राणवायू वाया घालवणे म्हणजे ज्याला त्याची गरज आहे त्याला त्यापासून वंचित करणे होय. -डॉ. नरेश त्रेहान