Coronavirus: जागतिक बँकेचा अंदाज; भारतात १ कोटी तर जगभरात ४.९ कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 04:10 AM2020-05-08T04:10:04+5:302020-05-08T07:10:24+5:30

जागतिक बँकेचा असा अंदाज आहे की, कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांना आता मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Coronavirus: World Bank forecast; 1 crore in India and 4.9 crore in the world? | Coronavirus: जागतिक बँकेचा अंदाज; भारतात १ कोटी तर जगभरात ४.९ कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत?

Coronavirus: जागतिक बँकेचा अंदाज; भारतात १ कोटी तर जगभरात ४.९ कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत?

Next

नवी दिल्ली : जगभरात ४.९ कोटी तर भारतातील १.२ कोटी लोक कोरोनाच्या संकटामुळे दारिद्र्यात ढकलले जाऊ शकतात, असा अंदाज जागतिक बँकेच्या एका अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे.

जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या डाटा ब्लॉगमध्ये ही चिंताजनक आकडेवारी आहे. यातील २.३ कोटी लोक आफ्रिका उपखंडातील असू शकतात, तर १.६ कोटी दक्षिण आशियातील असू शकतात. २०१९ मधील ८.२ टक्क्यांवरून दारिद्र्यातील लोकांची संख्या २०२० मध्ये ८.६ टक्के इतकी म्हणजेच ६.३२ कोटींवरून ६.६५ कोटी लोक इतकी वाढू शकते, असेही यात म्हटले आहे. जागतिक स्तरावरील दारिद्र्यात २०२० मध्ये ८.१ टक्क्यांवरून ७.८ टक्के घट होईल, असा अंदाज जागतिक नाणेनिधीने व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज कोरोना साथीच्या आधीचा होता. जागतिक बँकेचा असा अंदाज आहे की, कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांना आता मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या नायजेरियात ५० लाख, कांगोमध्ये २० लाख आणि इंडोनेशियात १० लाख, दक्षिण आफ्रि का, चीनमध्ये १० लाख होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा हाहाकार पर्ल हार्बर व ९/११ च्या हल्ल्याहून भीषण -ट्रम्प
कोरोनाच्या साथीने अमेरिकेत माजविलेला हाहाकार हा वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्वीन टॉवरवर झालेला ९/११चा दहशतवादी हल्ला, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पर्ल हार्बर येथे अमेरिकी सैनिकांवर जपानने केलेला हल्ला या दोन घटनांपेक्षाही भीषण आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 74000 हून जास्त रुग्ण अमेरिकेमध्ये कोरोनाच्या साथीमुळे मरण पावले आहेत, तर साडेबारा लाखांहून अधिक लोकांना या साथीची लागण झाली आहे. या भीषण परिस्थितीचा उल्लेख करून डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेवर अशा प्रकारचे मोठे संकट आजवर कधीही कोसळले नव्हते. कोरोना साथीमुळे सध्या बंद असलेल्या शाळा जेव्हा शक्य होईल तेव्हा पुन्हा सुरू करा.

60 वर्षे वयावरील लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यातही ज्यांना आधीपासून काही व्याधी आहेत त्यांनीही सध्याच्या दिवसांत सांभाळूनच राहिले पाहिजे, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

युरोपियन युनियन ऐतिहासिक मंदीच्या काठावर
2020 मध्ये युरोपची अर्थव्यवस्था ७.७५ टक्क्यांनी आक्रसलेली असेल तर २०२१ वर्षात ती ६.२५ टक्क्यांनी वाढलेली असेल, असे शिन्हुआ वृत्त संस्थेने म्हटले. कोविड-१९ महामारीचा युरोपियन युनियनच्या सगळ््या सदस्य देशांना फटका बसला आहे.

2019 मध्ये बेरोजगारीची टक्केवारी ७.५ टक्क्यांवरून २०२० मध्ये ९.५ टक्के होईल व २०२१ मध्ये ती ८.५ टक्के असेल. मागणीत घट आणि तेलाच्या किमती खाली आल्यामुळे ग्राहक किमतीत लक्षणीय घट अपेक्षित आहे. महामंदीनंतर युरोपला मोठा आर्थिक धक्का बसणार आहे. अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी युरोपियन युनियनच्या सदस्य देशांनी फार मोठा खर्च केलेला आहे, असे अहवालात म्हटले.

Web Title: Coronavirus: World Bank forecast; 1 crore in India and 4.9 crore in the world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.