नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बुधवारी (18 मार्च) दुपारी 2,19,033 वर पोहोचली होती. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 82909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे.
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली होती. त्यानंतर आता गुरुवारी (19 मार्च) 146 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशातील 16 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील काहींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोणत्या राज्यात किती रुग्ण हे जाणून घेऊया.
आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 1, दिल्लीमध्ये 11, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 13, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 42, पंजाबमध्ये 3, तेलंगणामध्ये 12, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 17, लडाख 8, तमिळनाडू 2, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. युरोपमध्ये एकूण 3421 आणि आशियामध्ये 3384 मृत्यू झाले आहेत.
सर्वात जास्त कोरोनाचा कहर इटलीमध्ये झाला आहे. इटलीमध्ये कालच्या दिवसभरात 475 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कोणत्याही देशाती आकडेवारीपेक्षा जास्त आहे. यामुळे इटलीमध्ये वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या 10000 विद्यार्थ्यांना डॉक्टर बनविण्यात आले आहे. त्यांची अंतिम परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्येही परिस्थिती बिघडत चालली आहे. संक्रमित लोकांची संख्या 254 झाली आहे. धक्कादायक म्हणजे येथे चांगली हॉस्पिटल नसल्याने त्याच्या फटका बसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'
Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर
मुंबईत दोन महिलांना कोरोनाची लागण; महाराष्ट्रात आकडा वाढला
कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पाहा
Coronavirus : हातावर शिक्का मारल्यानंतर पुढे काय? प्रवाशांमध्ये संभ्रम