देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 05:40 AM2021-07-25T05:40:48+5:302021-07-25T05:45:02+5:30

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.

The country railway stations will not be privatized; Information of Railway Minister in Rajya Sabha | देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती 

देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती 

Next

विकास झाडे

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकांच्या खासगीकरणासंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला नाही, त्यामुळे खासगीकरणाचा प्रश्न उद्‌भवत नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत माहिती दिली.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ना. वैष्णव म्हणाले, रेल्वे स्टेशन विकास कार्यक्रमांतर्गत कंत्राटदारांना काही ठरावीक काळासाठी रेल्वे परिसरातील पट्टे देण्यात आले आहेत; पण त्याचा मालकी अधिकार हा रेल्वे प्रशासनाकडे आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील प्रकल्पांची सद्य:स्थिती दर्शविणारी वस्तुस्थिती काय आहे आणि महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणती पावले उचलली? याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर वैष्णव म्हणाले की, रेल्वे प्रकल्प मंजूर राज्यस्तरीय नव्हे तर आणि विभागीय रेल्वेनिहाय असतात. कारण भारतीय रेल्वे नेटवर्क विविध राज्यांच्या हद्दीत पसरलेले आहे. महाराष्ट्र मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे आणि भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्राने व्यापला आहे. 

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करणार
एप्रिल २०२१ पर्यंतचे ९१ हजार १३७ कोटी रुपये खर्चून एकूण ६ हजार १४२ किमी लांबीच्या ३५ प्रकल्प योजना मंजुरीच्या आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात असून, त्यापैकी ९०६ किलोमीटर लांबीचे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मार्च २०२१ पर्यंत ११ हजार १८४ कोटी खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तरात दिली. 

Web Title: The country railway stations will not be privatized; Information of Railway Minister in Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.