शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध कल्पित बातम्यांना न्यायालयाची मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 2:14 AM

मुंबईतील जमिनीशी केलेल्या व्यवहाराच्या पुष्टी न मिळालेल्या वा सांगोवांगी माहितीच्या बातम्या छापण्यास किंवा प्रसारित करण्यास माध्यमांना मनाई करणारा आदेश न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे उद्योग समूहातील कंपनीने इकबाल मिर्ची याच्या पत्नीशी मुंबईतील जमिनीशी केलेल्या व्यवहाराच्या पुष्टी न मिळालेल्या वा सांगोवांगी माहितीच्या बातम्या छापण्यास किंवा प्रसारित करण्यास माध्यमांना मनाई करणारा आदेश न्यायालयाने दिला आहे.सात अग्रगण्य वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व वृत्तविषयक वेबपोर्टलविरुद्ध पटेल यांनी दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश टिष्ट्वंकल वाधवा यांनी हा अंतरिम आदेश दिला. या व्यवहारात मनीलाँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय व ईडी यांचा तपास पूर्ण होऊन त्यांनी आरोपपत्र दाखल करेपर्यंत वा पुढील आदेश होईपर्यंत हा मनाई आदेश लागू राहील.पटेल यांचे वकील अ‍ॅड. विजय अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले की, प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केलेला व्यवहार प्रामाणिक असून, त्याचा दाऊद इब्राहीम वा इक्बाल मिर्चीशी संबंध नाही. ईडीने याच संबंधात इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याच्या तपासात साक्षीदार म्हणून पटेल यांना जबाबासाठी बोलावले गेले होते. स्वत: पटेल यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली होती.तरीही पटेल हेच या प्रकरणात आरोपी आहेत, अशा ढंगाने बातम्या दिल्या जात आहेत.पटेल यांचे इक्बाल मिर्ची व पर्यायाने दाऊदशी संबंध जोडून त्याचाही तपास केला जात असल्याच्या बातम्या ईडी व सीबीआयमधील सूत्रांच्या नावाने दिल्या जात आहेत. हा पटेल यांचे निष्कारण चारित्र्यहन करण्याचा प्रकार आहे, असेही अ‍ॅड. अग्रवाल यांनी निदर्शनास आणले.न्यायालयाने प्रतिवादी माध्यमांचेही म्हणणे ऐकून नमूद केले की, माध्यमांना सत्याच्या व अधिकृत पुष्टी झाली आहे अशा माहितीच्या आधारे बातम्या देण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, हे स्वातंत्र्य उपभोगताना त्यांनी इतरांच्या इभ्रतीचेही भान ठेवायला हवे.बातम्या मिलेनियम कंपनी व हाजरा मिरची यांच्या जमीनविषयक करारातील माहितीच्या आधारे असतील त्यात काही गैर नाही; पण त्या कराराच्या आडून आणि तपासी यंत्रणांनी अधिकृत माहिती दिली नतताना सवंग बातम्या देऊन पटेल यांनी प्रतिमा मलिन करणे गैरआहे.आक्षेपार्ह बातम्या मागे घ्याया जमीन व्यवहाराच्या अनुषंगाने, तपास यंत्रणांचा तपास पूर्ण होऊन त्यांनी अहवाल न्यायालयात सादर करेपर्यंत पुष्टी नसलेल्या माहितीच्या आधारे पटेल यांचे चारित्र्यहन होईल, अशा बातम्या छापण्यास वा प्रसारित करण्यास प्रतिवादी माध्यमांना अंतरिम मनाई करण्यात येत आहे. त्यांनी याआधी प्रसिद्ध वा प्रसारित केलेल्या अशा आक्षेपार्ह बातम्याही मागे घ्याव्यात, असेही न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल