देशात ओमायक्रॉनचे एक हजाराहून अधिक व्हेरिअंट सापडले आहेत. यापैकी, 100 रिकॉम्बिनंट व्हर्जन आहेत. जे सध्या पसरलेले आहेत. सध्या XBB1.5 आणि XBB 1.16 हे व्हेरिअंट ऑफ इंटरेस्ट (VOI) आहेत. यांवर शास्त्रज्ञांचे बारकाईने लक्ष आहे. VOI असे असता, जे वेगाने पसरतात. मात्र घातक नसतात.
भारतात जिनोम सिक्वेंसिंगमध्ये कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिअंट सापडले आहेत. नात्र जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत इतर सर्व व्हेरिअंटची प्रकरणे कमी होताना दिसत आहेत. तर, कोरोनाच्या XBB.1.16 चे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. जानेवारी महिन्यात या व्हेरिअंटचे 2 रुग्ण होते. तर मार्च महिन्यात या व्हेरिअंटचे 204 रुग्ण समोर आले आहेत. तीन महिन्यात एकूण 344 रुग्णांना या व्हेरिअंटची लागण झाली आहे. महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्ये हा व्हेरिअंट पसरला आहे.
याशिवाय, XBB.1.5 च्या रुग्णांचा आकडाही गेल्या तीन महिन्यांत 196 वर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात येची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 46 होती, फेब्रुवारीमध्ये 103 झाले आणि मार्च महिन्यात 47 वर आले. मात्र XBB.2.3 एक असा व्हेरिअंट आहे, ज्याच्या रुग्णांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. जानेवारीमहिन्यात याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 9 होती. मार्चमहिन्यात 69 वर पोहोचली. मात्र जागतिक स्तरावर भारताची स्थिती उत्तम आहे.
जागतिक पातळीवर दैनंदीन सरासरी रुग्ण संख्या 93,977 एवढी आहे. अमेरिकेत एकून 19 टक्के नव्या रुग्ण नोंदवले जात आहेत. हा आकडा रशियात 12.9%, चीनमध्ये 8.3%, दक्षिण कोरियात 7%, तर भारतात जगातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% नोंदवली जात आहे.