नवी दिल्ली: गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये गलवान घाटीच्या परिसरात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या रक्तरंजित संघर्षात भारताचे जवान शहीद झाले. तर, दुसरीकडे चीनलाही मोठा फटका बसला. मात्र, अद्याप चीनने तसे मान्य केलेले नाही. यासंदर्भात भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी सुरक्षेतील गुंतवणुकीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. डोकलाम आणि गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली असून, संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीमुळेच हे शक्य झाल्याचे मोहंती यांनी नमूद केले. (army vice chief cp mohanty says if the country did not invest in security we would have probably lost the war in kargil)
“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत
लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण क्षेत्रात केंद्राने केलेल्या गुंतवणुकीबाबत मोठे विधान केले. देशाने सुरक्षेत गुंतवणूक केली नसती तर आम्ही कारगील, डोकलाममधील युद्धात पराभूत झालो असतो. जम्मू -काश्मीरमधील अंतर्गत सुरक्षा, तसेच आपला ईशान्य प्रदेश अशांत झाला असता आणि नक्षलवाद्यांना मोकळे मैदान मिळाले असते, असे मोहंती यांनी नमूद केले.
“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका
डोकलाम, गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली
तिबेटमध्ये मजबूत सशस्त्र सेना असती तर त्यांच्यावर कधीही आक्रमण झाले नसते. डोकलाम आणि गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली. पण त्याचसोबतच देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दर्जा देखील दिला गेला. प्रत्येकजण भारताकडे एक सुरक्षा प्रदाता म्हणून पाहतो. ते एका मोठ्या राष्ट्राच्या विरोधात सुरक्षा कवच आहे, असे मोहंती यांनी सांगितले.
“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश
भारतीय सशस्त्र दल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक
भारतीय सशस्त्र दल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत. कारण ते जात आणि पंथ या सर्वांवर आहेत. भारतीय सशस्त्र दलांना कोणत्याही राजकीय आकांक्षा नसतात आणि ते देशातील राजकारणाचा आदर करतात. अशी अनेक उदाहरण आहेत जिथे लष्करी नेत्यांना राजकीय आकांक्षा असतात. मात्र, भारतीय लष्कर दलांची अशी कोणतीही इच्छा नाही, असे मोहंती यांनी स्पष्ट केले.