बेकायदा पदोन्नती देणाऱ्या एअर इंडियाच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:46 AM2019-01-24T04:46:28+5:302019-01-24T04:47:15+5:30

एका अधिका-यास नियमबाह्य पद्धतीने बढती देणे व इतर तिघांना मेहेरनजर करून आर्थिक लाभ मिळवून देणे या आरोपांवरून केंद्रीय गुप्तचर विभागाने एअर इंडियाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला.

Crime against former Air India chairman, who is promoting illicit promotion | बेकायदा पदोन्नती देणाऱ्या एअर इंडियाच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा

बेकायदा पदोन्नती देणाऱ्या एअर इंडियाच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा

googlenewsNext

नवी दिल्ली: एका अधिका-यास नियमबाह्य पद्धतीने बढती देणे व इतर तिघांना मेहेरनजर करून आर्थिक लाभ मिळवून देणे या आरोपांवरून केंद्रीय गुप्तचर विभागाने एअर इंडियाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला.
गेल्या एप्रिलमध्ये सुरूकेलेल्या चौकशीनंतर नोंद गुन्ह्यात जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकाळात २०१० साली ज्यांना महाव्यवस्थापकपदी बढती देण्यात आली, ते कॅप्टन ए. कठपळिया, कॅ. अमिताभ सिंग व कॅ. रोहित भसिन आणि डॉ. श्रीमती एल. पी. नाखवा यांचाही समावेश आहे.
आपल्या मर्जीतील अधिकाºयांना पदोन्नती देण्यास अरविंद जाधव यांनी हे केले, असाही सीबीआयचा आरोप आहे. डॉ. नाखवा पात्र नसूनही अरविंद जाधव यांनी त्यांचा निवड समितीमध्ये समावेश केला आणि त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी कॅ. कठपळिया, कॅ. अमिताभ सिंग व कॅ. रोजहत भसिन या मर्जीतील अधिकाºयांना बढत्या देऊन त्यांना गैरवाजवी आर्थिक लाभ मिळवून दिला, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
श्रीमती नाखवा यांची २००९ मध्ये पदावनती करण्यात आली होती. तरीही त्या कार्यकारी संचालक म्हणून काम करीत राहिल्या. त्यास अरविंद जाधव यांनी आक्षेप घेतला नाही. उलट श्रीमती नाखवा यांची कार्यकारी संचालक या पदावर अरविंद जाधव यांनी कायम केले.

Web Title: Crime against former Air India chairman, who is promoting illicit promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.