तिरुवनंतरपूरम : आपल्या वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता आत्मचरित्र लिहिल्यामुळे गेले १८ महिने निलंबित असलेले केरळचे पोलीस महासंचालक जेकब थॉमस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामुळे त्यांना सेवामुक्त केले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य सचिव टॉम जोस यांच्या आदेशानुसार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जेकब थॉमस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यांनी लिहिलेल्या ‘शार्क माशांसह पोहताना’ या आत्मचरित्रामुळे केरळमध्ये प्रचंड वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.त्यांनी आपल्या या २४0 पानी आत्मचरित्रात अनेक राजकीय नेत्यांविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहे.माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी काही वादग्रस्त भ्रष्टाचाराची प्रकरणातील चौकशी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी लिहिले आहे. एवढेच नव्हे, तर सरकारी गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघन होईल, असाही मजकूर त्या पुस्तकात आहेत. (वृत्तसंस्था)>सक्तमजुरी होईल?पोलीस अधिकारी म्हणून काम करताना अनेकदा ज्या गोष्टी समजतात, त्या प्रसिद्ध करणे वा लोकांसमोर आणणे यांवर अनेक निर्बंध असतात. त्याचेही जेकब थॉमस यांनी पालन केलेले नाही, असा आरोप आहेत.त्यातून पोलीस कायद्याचाही भंग झाल्याचे सरकारचे म्हणणे आहेत. हे सारे आरोप सिद्ध झाल्यास पोलीस महासंचालकांना दोन वर्षे सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा होऊ शकते.
केरळच्या पोलीस महासंचालकांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:15 AM