क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवार पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:16 AM2024-02-28T06:16:27+5:302024-02-28T06:16:44+5:30

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांनी दिल्लीच्या नेतृत्वाला फोन करून आपण पक्षाच्या विरोधात नसल्याचे सांगितले.

Cross voting, Congress candidate defeated in rajya sabha election | क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवार पराभूत

क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवार पराभूत

- आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेश सरकारपुढे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांच्याविरोधात काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होट केले आणि भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले. 

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांनी दिल्लीच्या नेतृत्वाला फोन करून आपण पक्षाच्या विरोधात नसल्याचे सांगितले. या आमदारांची नाराजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यावर आहे. राज्य सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री बदलावे लागतील, असा दबाव पक्ष नेतृत्वावर आणला जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांचे गट अगोदरपासूनच सुक्खू यांच्या बाजूने नाहीत. 

टाॅसद्वारे निकाल
हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना समान ३४ मते मिळाली. त्यानंतर टाॅस करण्यात आला आणि त्यात भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले.

कर्नाटकात ३ जागा काॅंग्रेसला, १ भाजपला
कर्नाटकमध्ये काॅंग्रेसचे अजय माकन, नासिर हुसैन आणि जी. सी. चंद्रशेखर विजयी झाले. तर भाजपचे नारायण बंदिगे यांचाही विजय झाला. युपीमध्ये १० जागांसाठी मतमाेजणी सुरु हाेती.

Web Title: Cross voting, Congress candidate defeated in rajya sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.