कच्चा तेलाचा भाव 14 डॉलरने घसरला, पण भारतात पेट्रोल-डिझेल जैसे थे; जाणून घ्या आजचे दर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:22 AM2021-12-03T09:22:19+5:302021-12-03T09:22:48+5:30
गेल्या महिन्यात प्रति बॅरल 85 डॉलरच्या पातळीवर पोहोचलेल्या कच्चा तेलाचे दर 70 डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहेत.
नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात(Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली, परंतु तेव्हापासून देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत.
कच्चा तेलाचे दर घसरले
कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत लक्षणीय घसरल्या आहेत. गेल्या महिन्यात प्रति बॅरल $85 च्या पातळीवर पोहोचलेले ब्रेंट क्रूड ऑईल गेल्या काही आठवड्यात घसरले आहे. सध्या कच्चा तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारात $70-72 रुपये प्रति बॅरल दर आहेत. 3 नोव्हेंबर रोजी ब्रेंट क्रूड $ 84वर विकले जात होते, तर 3 डिसेंबर रोजी त्याचे भाव $70 च्या पातळीवर आले होते. म्हणजेत कच्चा तेलाचे दर 14 डॉलरने घसरले आहेत. पण, अद्याप भारतीयांना पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा मिळालेला नाही.
देशातील दर जैसे थे
काल आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $70 च्या पातळीवर आला होता, तर आठवड्यापूर्वी तो $79 प्रति बॅरल होता. त्याच वेळी, ब्रेंट क्रूडची वायदे किंमत 2.99 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 70.45 वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरुवारपासून दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पण, अजूनही देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे भाव 100च्या पुढेच आहेत.
हे आहेत विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर:
- मुंबई: पेट्रोल - ₹109.98 प्रति लिटर; डिझेल - ₹ 94.14 प्रति लिटर
- दिल्ली: पेट्रोल - ₹95.41 प्रति लिटर; डिझेल - ₹86.67 प्रति लिटर
- कोलकाता: पेट्रोल - ₹104.67 प्रति लिटर; डिझेल - ₹ 89.79 प्रति लिटर
- चेन्नई: पेट्रोल - 101.40 रुपये प्रति लिटर; डिझेल - ₹91.43 प्रति लिटर
- नोएडा: पेट्रोल - ₹95.51 प्रति लिटर; डिझेल - ₹ 87.01 प्रति लिटर
- भोपाळ: पेट्रोल - ₹107.23 प्रति लिटर; डिझेल - ₹90.87 प्रति लिटर
- बंगळुरू: पेट्रोल - ₹100.58 प्रति लिटर; डिझेल - ₹ 85.01 प्रति लिटर
- लखनऊ: पेट्रोल - 95.28 रुपये प्रति लिटर, डिझेल - 86.80 रुपये प्रति लिटर
- चंदीगड: पेट्रोल - ₹94.23 प्रति लिटर; डिझेल - 80.90 रुपये प्रति लिटर
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा
परकीय चलन बाजार आणि कच्च्या तेलाच्या किमतींनुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती देशात दररोज बदलतात. चांगली गोष्ट म्हणजे तेलाची किंमत तुम्हाला घरबसल्या कळू शकते. यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल मेसेज सर्व्हिस अंतर्गत 9224992249 या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. यासाठी तुम्हाला मेसेजमध्ये लिहावे लागेल - RSP