बळीराजाची क्रुर थट्टा, युपी सरकारने दिली अवघ्या 9 पैशांची कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 10:11 PM2017-09-13T22:11:37+5:302017-09-13T23:16:00+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर एप्रिल महिन्यात उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकरनं शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. योगी सरकारनं यावर अमंलबजावणी सुरु केली असून

The cruel joke of the victim, the UPA government gave only 9 paisa debt waiver | बळीराजाची क्रुर थट्टा, युपी सरकारने दिली अवघ्या 9 पैशांची कर्जमाफी

बळीराजाची क्रुर थट्टा, युपी सरकारने दिली अवघ्या 9 पैशांची कर्जमाफी

googlenewsNext

मेरठ, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर एप्रिल महिन्यात उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकरनं शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. योगी सरकारनं यावर अमंलबजावणी सुरु केली असून राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाखांपर्यंतचे कर्जमाफी करण्यास सुरुवात केली आहे. एककीकडे एक लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचे सरकारनं पाऊल उचलले आहे. याबाबत प्रत्येक जिल्ह्यात कर्जमाफीचे प्रमाणपत्रही दिले जात आहे. तर दुसरीकडे पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये  आधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागला आहे. यावर विरोधाकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एक लाख रुपयांच्या ऐवजी बागपतमधील एका शेतकऱ्याला आठ पैशांची कर्जमाफी मिळाली आहे. तर बिजानेर मधील शेतकऱ्याला फक्त नऊ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. 

बाजानेरमधील 14,188 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पहिल्या फेरीत 5,026 बळीराजांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले. यामधील काही शेतकऱ्य़ांना 10 रुपये, 38 रुपये कर्जमाफी दिल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. 114 शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ झाले.  एका शेतकऱ्याच्या नावावर 60हजार रुपयांचे कर्ज होते पण त्याला फक्त 38 रुपयांचे कर्जमाफ झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले. एक हजार रुपयांपेक्षा कमी कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण 23 आहे. यामध्ये 9 पैशांपासून 377 रुपयापर्यंतचे त्यांचे कर्जमाफ झास्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहे. 

नगीनातील बलीया या शेतकऱ्याला 9 पैले, बास्टाच्या चरन सिंहला 84 पैसै, आंकूच्या रामधनला दोन रुपये, अफजलगढच्या भागेशला 6 रुपये, भंडवराच्या हिराला 3 रुपये, नजीयाबादच्या जसवंतील 21 रुपये, धामपुरलाच्या बलजीला सिंहला 126 रुपये आणि किरतपूरच्य़ा दौलत सिंगला 377 रुपये कर्जमाफी दिली आहे. 
 

उत्तरप्रदेश सरकारच्या या कर्जमाफीचा लाभ 86 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी आदित्यनाथ सरकारला 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. 

Web Title: The cruel joke of the victim, the UPA government gave only 9 paisa debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.