Suresh Raina Kashmiri Pandit : माझ्या काश्मीरी हिंदू भगिनीची व्यथा ऐका, पंतप्रधान नरेंद्र मोदी; सुरेश रैनाने पोस्ट केला मन पिळवटून टाकणारा Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 11:34 PM2022-05-14T23:34:07+5:302022-05-14T23:34:39+5:30

Suresh Raina Kashmiri Pandit :  जम्मू-काश्मीरमध्ये  काश्मीरी पंडित राहुल भट्ट ( Rahul Bhatt) यांची हत्या  झाल्याने तेथील वातावरण पेटले आहे.

CSK and EX-Indian Player Suresh Raina appeal PM Narendra Modi to look into Kashmiri hindu matter, share women Cry Video | Suresh Raina Kashmiri Pandit : माझ्या काश्मीरी हिंदू भगिनीची व्यथा ऐका, पंतप्रधान नरेंद्र मोदी; सुरेश रैनाने पोस्ट केला मन पिळवटून टाकणारा Video 

Suresh Raina Kashmiri Pandit : माझ्या काश्मीरी हिंदू भगिनीची व्यथा ऐका, पंतप्रधान नरेंद्र मोदी; सुरेश रैनाने पोस्ट केला मन पिळवटून टाकणारा Video 

Next

Suresh Raina Kashmiri Pandit :  जम्मू-काश्मीरमध्ये  काश्मीरी पंडित राहुल भट्ट ( Rahul Bhatt) यांची हत्या  झाल्याने तेथील वातावरण पेटले आहे. काश्मीरी पंडितांकडून विरोधात आंदोलन केले जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानेही काश्मीरी पंडितांच्या न्यायासाठी आवाज उचलला आहे. त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. रैनाने त्याच्या ट्विटर हँडलवर एका महिलेचा व्हिडीओ पोस्ट करून  मोदींना तिची व्यथा ऐकण्याचे आवाहन केले आहे.

सुरेश रैनाने लिहिले की, माझ्या काश्मीरी हिंदू भगिनीची व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकावी ही विनंती. सर्व भारतीयांना काश्मीरातील पिडितांसाठी एकत्र उभं राहायला हवं. त्यांना एकटं सोडायला नको. आशा करतो की त्यांच्या व्यता ऐकून तुम्ही त्यांची पोस्टींग सुरक्षित ठिकाणी कराल.''

काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली' 
 

  • काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) राहुल भट्ट यांची जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम येथील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी (Terrorist) हत्या केली, त्याविरोधात आज (शुक्रवार) काश्मिरी पंडितांचा बडगाममध्ये निषेध सुरू आहे. दरम्यान, राहुल भट्ट यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. धोका असूनही पती राहुल भट्ट (Rahul Bhatt) यांना सुरक्षा देण्यात आली नसल्याचे तिने आरोप केला आहे.
  • राहुल भट्ट यांच्या पत्नीने सांगितले की, दहशतवाद्यांना तिथे राहुल असल्याचे कसं कळलं. सगळे राहुल यांना चांगले म्हणायचे. ते रस्त्यातून जाताना सगळे नमस्कार करायचे. त्यावेळी ते  राहुलला सांगायचे की, तुझ्याशिवाय बडगाम अपूर्ण वाटते. मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील.
  • ती पुढे म्हणाली की, खांद्याला गोळी लागल्याचे प्रथम कळले. मला वाटलं, खांद्याची एक बाजू जाईल, काहीही झालं तरी मी करेन. पाय गेले तरी मी काही ना काही केले असते. पण त्याला जीव गमवावा लागला. मी आता एकटीच राहिली आहे.माझ्यासोबत कोणीच नाही आहे. राहुलच माझं सर्वस्व होतं. राहुल भट्ट यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी नव्हते.

Web Title: CSK and EX-Indian Player Suresh Raina appeal PM Narendra Modi to look into Kashmiri hindu matter, share women Cry Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.