नवी दिल्ली : इसिसपासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हरकत उल हर्ब- ए- इस्लाम या दहशतवादी गटाचा घातपाती कारवायांचा कट उधळून लावल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे. संगणक, मोबाईलवर पाळत ठेवण्याचे अधिकार तपास यंत्रणांना देण्याच्या गृहविभागाच्या अधिसूचनेमुळेच हे शक्य झाले, असे सांगून जेटली यांनी काँग्रेसलाही टोला लगावला आहे.जेटली यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, गृहविभागाने काढलेली अधिसूचना योग्यच होती. यूपीए सरकारने त्यांच्या कारकीर्दीत सामाजिक अपप्रवृत्तींवर बारीक लक्ष ठेवले होते का? तसे झाले असते, तर मे, २०१४ मध्ये जॉर्ज आॅर्वेलचा भारतात नक्कीच उदय झाला नसता. राष्ट्रीय सुरक्षा व देशाचे सार्वभौमत्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
मोबाईलवर पाळत ठेवल्यानेच कट उघडकीस -जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:52 AM