Cyclone Amphan : ...म्हणून अमित शहांनी केला ममता बॅनर्जींना फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:46 PM2020-05-19T16:46:45+5:302020-05-19T16:58:11+5:30
Cyclone Amphan : गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
नवी दिल्ली - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे आता सुपर चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. त्यातील वाऱ्याचा वेग ताशी 230 किमीपर्यंत वाढला आहे. 20 मे रोजी हे चक्रीवादळ तीव्र वेगानं पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकू शकते. यामुळे ओडिशातील किनारपट्टी व पश्चिम बंगालच्या गंगानदीजवळील भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्राकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे. तसेच अम्फान वादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय सैन्य, नौदल आणि नौदलाच्या जहाजांसह नौदलाचे विमाने, हवाई दल आणि तटरक्षक दलालाही सज्ज राहण्यास सांगितले जात असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शहा यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी देखील चर्चा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Home Minister Amit Shah has also spoken to Odisha Chief Minister Naveen Patnaik and reviewed the preparedness. He again reiterated that Central Government is ready to provide any support needed from them by both the affected states: Ministry of Home Affairs (MHA) https://t.co/dpy6a5f5RS
— ANI (@ANI) May 19, 2020
'अम्फान'मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएमओने निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी आपत्ती निवारण प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) केलेल्या तयारीचा, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. गृहराज्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) च्या अधिकाऱ्यांसमवेत पंतप्रधानांची काल बैठक झाली. एक तासापेक्षा जास्त काळ ही बैठक चालली. त्यात गृहमंत्री अमित शहा हेदेखील उपस्थित होते.
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...https://t.co/jkcEsiL0M7#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown#Children
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2020
वाऱ्याचा वेग ताशी 230 किमीपर्यंत वाढला आहे. दरम्यान, मान्सूनची वाटचाल सुरू असून सोमवारी मान्सूनने निकोबार बेटे व्यापली आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे रुपांतर सोमवारी दुपारी सुपर चक्रीवादळात झाले. यावेळी त्याचा जोर कमी होऊन तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले असेल. यावेळी किनारपट्टीवर ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदतhttps://t.co/yMYuNQZ1eg#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown#Travel#epass
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2020
CoronaVirus : फक्त 12 दिवसांत देशातील रुग्णांची संख्या दुप्पट; कोरोनाचा धक्कादायक ग्राफ https://t.co/2wBiI8032O#CoronaUpdatesInIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...
CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"
Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत
CoronaVirus : फक्त 12 दिवसांत देशातील रुग्णांची संख्या दुप्पट; कोरोनाचा धक्कादायक ग्राफ
CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी
CoronaVirus News : X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?
CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार