नवी दिल्ली - गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घड़ली आहे. एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट (Cylinder blast in Gujarat) झाला असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अहमदाबाद ग्रामीणच्या असलाली पोलीस ठाण्याचे एस.एस. गामेटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. मात्र उपचारादरम्यान आता त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.
महिला आणि लहान मुलांचा देखील या भीषण स्फोटात मृत्यू झाला आहे. 20 जुलै रोजी रात्री ही दुर्घटना घडली. काही कामगार कारखान्यात काम करीत होते व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य हे एका खोलीत झोपले होते तेव्हा एलपीजीची गळती सुरू झाली. याचा अंदाज येताच जेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी दार वाजवून सतर्क केले तेव्हा कामगारांनी दिवा लावला. त्यातून स्फोट होऊन आणखी मोठी दुर्घटना घडली. त्यावेळी तेथे दहा जण झोपलेले होते. त्यापैकी अनेक जण गंभीर भाजले. तीन जणांचा उपचारावेळी गुरुवारीच मृत्यू झाला होता.
जखमींपैकी तर इतर चार जणांचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला. काही जणांवर रुग्णालयात अजून उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बंदुकीसोबत सेल्फी काढणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. तिला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या माहेरच्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. हुंड्यासाठी आपल्या मुलीचा प्रचंड छळ करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच दोन लाखांसाठी सासरची म़ंडळी तिला खूप त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बंदुकीसोबत सेल्फी काढणं पडलं महागात, नवविवाहितेचा मृत्यू पण माहेरच्यांनी केला धक्कादायक खुलासा
तरुणीचे वडील राकेश कुमार यांनी मुलीचा पती आकाश आणि सासू-सासरे यांच्या विरोधात हुंड्यासाठी 2 लाख रुपये मागून अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गुप्ता याचं लग्न राधिका हिच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी झालं होतं. साधारण 2 वाजेदरम्यान राधिका बंदुकीसह सेल्फी घेत असताना अचानक गोळी झाडली गेली आणि यात राधिकाचा मृत्यू झाला. यानंतर तातडीने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. बंदुकीची गोळी राधिकाच्या गळ्याच्या आरपार गेली. पोलिसांनाही या प्रकरणाची सूचना देण्यात आली. अधिक तपासासाठी पोलिसांनी राधिकाचा मोबाईल जप्त केला आहे.