ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 30 - धोकादायक नसणारी औषधं जास्त प्रमाणात घेणं जीवावर बेतू शकतं. नुकतचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात ड जीवनसत्वाचे डोस घेतल्याने 10 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयाने शारिरिक वाढ होण्यासाठी 'ड जीवनसत्व' घेण्याचा सल्ला दिला होता. पिडीत मुलाने 21 दिवसांत ड जीवनसत्वाचे सहा लाख इंटरनॅशन युनिट डोस घेतले होते. ज्यांचं प्रमाण मर्यादेपेक्षा 30 पटीहून अधिक होतं. लहान मुलांसाठी दिवसाला ड जीवनसत्वाचे एक हजार इंटरनॅशन युनिट डोस देऊ शकतो. ही मर्यादा आठवड्यासाठी 60 हजार आहे.
'डोसचं प्रमाण अधिक झाल्याने मुलाच्या शरिरात संसर्ग झाला होता, ज्यामुळे त्याला पोटात दुखण्याचा आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला एम्स रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. आम्ही त्याच्यावर प्राथमिक उपचार केले पण त्याची तब्ब्येत बिघडू लागल्यार आयसीयूमध्ये भर्ती करावं लागल्याची', माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या केसची नोंद इंडियन जनरलच्या बालरोगतज्ञावरील ताज्या अंकात करण्यात आली आहे.
सुर्यप्रकाशच्या कमतरतेमुळे शरिरातील ड जीवनसत्व कमी होतं असत. अशावेळी डॉक्टर औषध घेण्याचा सल्ला देतात. मात्र अशा औषधांमुळे मृत्यू होण्याची शक्यता फार कमी आहे. उलटी, वजन कमी होणं अशा प्रकारचा त्रास होणं शक्य आहे. 'ड जीवनसत्वाच्या डोसचा परिणाम त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो जे ठराविक कालावधीनंतरही औषध घेणं सुरु ठेवतात. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेणा-यांनाही हा त्रास होतो', अशी माहिती अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर सुरणजीत चॅटर्जी यांनी दिली आहे.