लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मे महिन्यात देशाच्या सेवा क्षेत्रातील पर्चेस मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले असून, त्यामुळे नोकºयाही कमी झाल्या आहेत. मे महिन्याचा सेवा क्षेत्राचा पीएमआय १२.६ एवढा अल्प झाला आहे.आयएचएस मार्किट इंडियातर्फे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात मे महिन्यात देशातील सेवा क्षेत्राचा पीएमआय १२.६ एवढा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्यात हा निर्देशांक ५.४ असा आतापर्यंतचा सर्वात कमी राहिला आहे. एप्रिलपेक्षा मे महिन्यामध्ये त्यात वाढ झाली असली तरी त्यामुळे नोकऱ्यांच्या प्रमाणात फारसा फरक पडला नसल्याचे आयएचएस मार्किटतर्फे सांगण्यात आले.देशातील सेवा क्षेत्र तसेच उत्पादन क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांचा पीएमआय वेगवेगळा मोजला जातो. मे महिन्यात उत्पादन क्षेत्राचा पीएमआय कमी झालेला दिसून आला आहे.लॉकडाउनचा बसला फटकादेशात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग बंद आहेत. त्याचा फटका सेवा क्षेत्रालाही बसला आहे. या क्षेत्रातील अनेकजण घरून काम करीत असले तरी मागणीच कमी झालेली असल्याने या व्यक्तींनाही फारसे काम उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक संस्थांनी आपल्या कर्मचाºयांची संख्या कमी करण्यास प्रारंभ केला आहे. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन सुरू असल्याने सेवा क्षेत्राला बाहेरून मिळणारे कामही कमी झालेले दिसून येत आहे. पीएमआय ५० पेक्षा अधिक असल्यास त्या क्षेत्रात वाढ झाल्याचे मानले जाते.
मेमध्ये सेवा क्षेत्राच्या पीएमआयमध्ये घट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 4:39 AM