नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री म्हणून आपल्याला हटवून दाखवा, अशी धमकी राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी भाजपाला दिली.भाजपाच्या नेतृत्वातील आघाडीत रहायचे की नको? याबाबत या पक्षाची बैठक होणार असून त्या बैठकीपूर्वीच कुशवाह यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपा त्यांना दोन जागा देण्यास तयार आहे. मात्र, त्यांच्याकडून यापेक्षा अधिक जागा मागितल्या जात आहेत.कुशवाह म्हणाले, मी सद्या मंत्री आहे आणि मेपर्यंत मंत्री राहणार आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपल्याला मंत्रिमंडळातून हटवू शकतात.
मंत्रिपदावरून हटवून दाखवा, कुशवाह यांची भाजपाला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:37 AM