... त्यामुळे उत्तराखंडमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपरने होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:50 AM2018-10-16T10:50:58+5:302018-10-16T10:52:55+5:30

आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिकतम सुरक्षा आणि बंदोबस्ताची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे.

Dehradun ballot paper will use in uttarakhand Election 2018 not evm | ... त्यामुळे उत्तराखंडमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपरने होणार मतदान

... त्यामुळे उत्तराखंडमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपरने होणार मतदान

Next

डेहरादून - उत्तराखंडमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरच्या सहाय्याने घेण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिनची संख्या 1790 एवढी आहे. त्यामुळे नवीन मशिनची खरेदी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे 7 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही हे बजेट मंजूर झाले नाही. त्यातच, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची घाई असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिकतम सुरक्षा आणि बंदोबस्ताची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात विस्तारीकरण झाले आहे. त्यामुळे तेथील पालिका क्षेत्रातही बदल झाला आहे. हेही कारण निवडणूक आयोगाकडून पुढे करण्यात येत आहे. डेहरादून, हरिद्वार, हल्द्वानीसह अनेक पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सीमा विस्तार झाला आहे. देहरादून नगर पालिका क्षेत्रात 2013 मध्ये 60 वार्ड होते, तेथे आता 100 वार्ड बनले आहेत. त्यामुळे कमी प्रमाणातच ईव्हीएम मशिनद्वारे निवडणुका होतील. तर निवडणुकांसाठी बॅलेट पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येईल.

आमच्याकडे कमी प्रमाणात ईव्हीएम मशिन उपलब्ध आहेत. तर बहुतांश ईव्हीएम मिशनमध्ये बिघाडही आहे. आम्ही हरयाणातून ईव्हीएम मशिन घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळेच एवढ्या कमी कालावधीत ईव्हीएम मशिनच्या सहाय्याने निवडणुका घेणे, त्रासदायक असल्याने आम्ही सर्वच ठिकाणी बॅलेट पेपरच्या सहाय्याने मतदान घेण्याचे ठरवले आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त चंद्रशेखर भट्ट यांनी सांगितले.  

Web Title: Dehradun ballot paper will use in uttarakhand Election 2018 not evm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.