दिल्ली मृत्युकांड: ते बुवाबाजी मानत नव्हते, कोणीतरी त्यांचे खून केलेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:10 AM2018-07-03T01:10:33+5:302018-07-03T01:10:49+5:30

उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात रविवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळलेल्या एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींच्या मृतदेहांपैकी सहा मृतदेहांचे ‘पोस्टमार्टेम’ सोमवारी पूर्ण झाले व त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला.

Delhi death: They did not consider bowaji, some killed them | दिल्ली मृत्युकांड: ते बुवाबाजी मानत नव्हते, कोणीतरी त्यांचे खून केलेत

दिल्ली मृत्युकांड: ते बुवाबाजी मानत नव्हते, कोणीतरी त्यांचे खून केलेत

Next

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात रविवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळलेल्या एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींच्या मृतदेहांपैकी सहा मृतदेहांचे ‘पोस्टमार्टेम’ सोमवारी पूर्ण झाले व त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला. तरी घरात सापडलेल्या दोन वह्यांमधील गूढ लिखाणाने संपूर्ण कुटुंबाने अघोरी विद्येच्या आहारी जात आत्मघात करून घेतला असावा, अशी शंका सगळ््यांनी व्यक्त केली. मात्र या कुटुंबातून लग्न होऊन गेलेल्या कन्या सुजाता यांनी मात्र ही शक्यता ठामपणे फेटाळली आहे.
११ पैकी घरातील नारायण देवी भाटिया या ७७ वर्षीय वृद्धेचा मृतदेह इतरांप्रमाणे लटकताना नव्हे, तर बिछान्यावर मिळाल्याने तो कदाचित खुनाचा प्रकार असावा, असे पोलिसांना वाटते. खास डॉक्टरांच्या पथकाने सहा मृतदेहांचे ‘पोस्टमार्टेम’ केल्यावर खुनाची शक्यता सकृतद्दर्शनी मागे पडली. मृतदेहांवर झटापटीच्या खुणा आढळल्या नाहीत. घिरात इतस्तत: विखुरलेली आठ लाकडी स्टुले सापडणेही आत्महत्येचे निदर्शक मानले जात आहे.
हे कुटुंब अत्यंत धार्मिक व परोपकारी वृत्तीचे होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर २२ अंधांना दृष्टी मिळावी, यासाठी त्या सर्वांचे नेत्रदानाचे फॉर्म भरून दिल्याचे जवळच्या नातेवाइकाने सांगितले.

अगदी लिहिले तसेच
सापडलेल्या वह्यांमधील लिखाण जे घडले ते त्या बरहुकूम घडले, म्हणून बुचकळ्यात टाकणारे आहे. वहीत लिहिले होते,‘पट्टीया अच्छेसे बांधनी है.. शून्य के अलावा कुछ नही दिखना चाहिये... रस्सी के साथ सूती चुन्नीया या साडी का परयोग करना है... सात दिन लगातार बडपूजा करनी है... बेब्बे (नारायणी देवी) खडी नही हो सकती तो अलग कमरे मे लेट सकती है..’ ही साम्यस्थळे संशय वाढविणारी आहेत.

Web Title: Delhi death: They did not consider bowaji, some killed them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.