नवी दिल्ली : जसजशी दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतशा सोशल मीडियासह विविध सभांमध्ये निवडणूक प्रचाराचा जोर वाढत आहे. भाजपा, आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस एकामेकांविरुद्ध जोरदार प्रचार करीत आहेत.
दिल्लीतील मतदारांचा कल जाणून घेतला असता दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचाच बोलबाला असल्याचे दिसून आले आहे. मात्र, प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख भाजपाच्या नेत्यांकडून दहशतवादी असा करण्यात आला आहे. याला प्रतिउत्तर देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल राजकीय मैदानात उतरली आहे.
एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 'राजकारण चुकीचे आहे. मात्र, याचा स्तर खाली जात आहे. जर लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळवून देत असेल तर तो दहशतवाद आहे का? असा सवाल करत हर्षिताने आपल्या वडिलांना दहशतवादी म्हटल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. याचबरोबर, जर मुलांना चांगले शिक्षण पुरविले जात असेल तर तो दहशतवाद का? जर वीज आणि पाण्याची सोयी सुविधा वेळेत पुरविली जात असेल तर तो दहशतवाद का? असेही सवाल हर्षिताने उपस्थित केले आहेत.
याशिवाय, माझे वडील सामाजिक काम करीत आले आहेत. माझ्या आठवणीत आहे की, माझे वडील दररोज सकाळी 6 वाजता उठवून आमच्या कुटुंबाला भगवत गीताचे पाठ वाचवून दाखवित. तसेच, आम्ही 'इंसान का इंसान से हो भाईचारा' हे गाणे सुद्धा म्हणायचो. हा दहशतवाद कसा असेल? असे हर्षिताने म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीची सत्ता पुन्हा राखण्यासाठी कंबर कसलेल्या आपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यामधून आपने पुढील पाच वर्षांसाठीचा कार्यक्रम जनतेसमोर मांडला आहे. यामध्ये दिल्लीत जनलोकपाल आणि स्वराज बिल लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबरोबरच शाळेत देशभक्तीपर अभ्यासक्रमही लागू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे.
आपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने- दिल्लीतील प्रत्येक मुलाला शालेय शिक्षणाची हमी - दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला निरोगी आरोग्याची हमी - दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी शुद्ध पाण्याची हमी - प्रत्येक घरापर्यंत 24 तास पिण्याचे पाणी पोहोचवण्याची हमी - प्रत्येक ग्राहकाला 24 तास आणि 200 यूनिटपर्यंत मोफत विजेची हमी- प्रदूषणाची पातळी कमी करण्याची हमी - यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करणार - महिला सुरक्षेसाठी दिल्लीमध्ये सीसीटीव्ही, स्ट्रीट लाइट आणि महिला मार्शलची नियुक्ती करणार - कच्च्या वस्त्यांचे पक्के बांधकाम करण्याची हमी
महत्त्वाच्या बातम्या
निर्भयाच्या गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लकटवणार की वेगवेगळे? आज निर्णय
एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा
केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप
औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती; घरात घुसण्यास विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Delhi Election 2020 : 'पंतप्रधान मोदी ताजमहालही विकतील', राहुल गांधीचं टीकास्त्र