Delhi Election Results : दिल्लीमध्ये मतदान कमी, पण नोटा वाढले!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:04 AM2020-02-13T10:04:07+5:302020-02-13T10:06:45+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले असले तरी नोटामध्ये मात्र वाढ झाली आहे.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले असले तरी नोटामध्ये मात्र वाढ झाली आहे. एकूण 70 मतदारसंघांमध्ये 43 हजार 108 लोकांनी नोटाचे बटण दाबून आपापल्या मतदारसंघातील उमेदवारांना नाकारले आहे.
2015 च्या निवडणुकीत 62.59 मतदान झाले होते. त्यावेळी आपने 67 जागांवर विजय मिळवला होता आणि 35 हजार 924 लोकांनी नोटाला पसंती दिली होती. यंदा त्यात शुन्य दशांश एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. मटियाला मतदारसंघात सर्वाधिक 1602 लोकांनी नोटाला पसंती दिली आहे. येथून आपचे गुलाब सिंग यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे मटिया महल मतदारसंघात आपचे शोएब इक्बाल यांनी भाजपाच्या रविंद्र गुप्ता यांचा तब्ब्ल 50 हजार मतांनी पराभव केला. येथे सर्वात कमी 216 नोटांची नोंद झाली आहे. एकूण 70 पैकी सहा मतदारसंघामध्ये एक हजाराहून अधिक मतं ही नोटाला पडली आहेत.
दिल्लीत भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी रविवारी रामलीला मैदानावर होणार आहे. आप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केजरीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी याच मैदानावर केले होते. त्यामुळे तिथे शपथविधी सोहळा आहे.
देशाच्या राजधानीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर केजरीवाल यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा वाढलेला आहे. विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांमध्ये केजरीवाल यांचे स्थान बळकट होत आहे. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणाऱ्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांना महत्त्व प्राप्त होणार आहे. राजकीय विश्लेषकांचे मते, राष्ट्रीय राजकारणात अरविंद केजरीवाल यांना प्रमुख विरोधी चेहरा म्हणून उभारण्यास आणखी काही काळ लागेल. सध्या अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला निवडणूक आयोगाकडून प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता आहे. 2017 मध्ये पंजाबमध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपने ओळख निर्माण केली. मात्र 'आप'च्या राष्ट्रीय राजकारणाला गोवा विधानसभा आणि मागील दोन लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. या दोन्ही निवडणुकीत आपला अपयश आलं.
महत्त्वाच्या बातम्या
China Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव
दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे
ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना
यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा