कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, केजरीवालांनी दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 08:08 PM2020-02-28T20:08:25+5:302020-02-28T20:11:43+5:30

पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.

delhi government given approval for a trial in jnu sedition matter former jnu student kanhaiya kumar vrd | कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, केजरीवालांनी दिली मंजुरी

कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, केजरीवालांनी दिली मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देजवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींनी नऊ फेब्रुवारी 2016 जेएनयू परिसरात एका कार्यक्रमादरम्यान रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केलं होतं.

नवी दिल्लीः दिल्ली सरकारनं देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींनी नऊ फेब्रुवारी 2016 जेएनयू परिसरात एका कार्यक्रमादरम्यान रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केलं होतं.

जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार याने सध्या केंद्रातील सरकार आणि नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान, कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक गोष्टीमुळे वादग्रस्त ठरली. या सभेच्या शेवटी भाषण देण्यास उठलेल्या कन्हैया कुमारने उत्साहाच्या भारात राष्ट्रगीताने आपल्या भाषणाची सुरुवात केली. मात्र स्वत: कन्हैया कुमारच राष्ट्रगीतातील शेवटच्या ओळी विसरला. ही बाब चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान, कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे आयोजित करण्यात आलेली ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभा या व्यतिरिक्तही इतर अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली. कन्हैयाचे भाषण सुरू होण्यापूर्वी सहा-सात वर्षांच्या मुलाने देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चार ओळी ऐकवल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर कन्हैया कुमारने या मुलाला आपल्या जवळ बोलावून त्याला आलिंगण दिले.
 

Web Title: delhi government given approval for a trial in jnu sedition matter former jnu student kanhaiya kumar vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.