नवी दिल्लीः दिल्ली सरकारनं देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींनी नऊ फेब्रुवारी 2016 जेएनयू परिसरात एका कार्यक्रमादरम्यान रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केलं होतं.
कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, केजरीवालांनी दिली मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 8:08 PM
पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
ठळक मुद्देजवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींनी नऊ फेब्रुवारी 2016 जेएनयू परिसरात एका कार्यक्रमादरम्यान रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केलं होतं.