दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सोपवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राजीनामा देण्यामागे वैयक्तीत कारण असल्याचे म्हटले आहे. बैजल यांनी 31 डिसेंबर 2021 रोजी आपल्या पदाची पाच वर्षे पूर्ण केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे, दिल्लीच्या नायब राज्यपालांचा कार्यकाल निश्चित नसतो.
अनेक कारणांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळेही बैजल यांचे नाव चर्चेत होते. दिल्ली सरकारने केलेल्या 1000 बसेसच्या खरीद प्रक्रियेसंदर्भातील चौकशीसाठी बैजल यांनी तीन सदस्यिय समितीही स्थापन केली होती. यासंदर्भात भजप कडूनही सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी होत होती.यासंदर्भात नायब राज्यपालांनी जे पॅनल तयार केले होते, त्यात एक निवृत्त IAS अधिकारी, दक्षता विभागाचे प्रधान सचिव आणि दिल्ली सरकारचे ट्रान्सपोर्ट कमिश्नर यांचा समावेश होता. यामुद्द्यावरूनही केजरीवाल सोबत त्यांचे संबंध बिघडले होते.