दिल्ली तापली, केजरींच्या पाठी चार मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:21 AM2018-06-18T05:21:03+5:302018-06-18T05:21:03+5:30

सनदी अधिकाऱ्यांविरोधात सत्ताधारी आम आदमी पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाने दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Delhi Tapali, four Chief Ministers of Kejri | दिल्ली तापली, केजरींच्या पाठी चार मुख्यमंत्री

दिल्ली तापली, केजरींच्या पाठी चार मुख्यमंत्री

googlenewsNext

नवी दिल्ली : सनदी अधिकाऱ्यांविरोधात सत्ताधारी आम आदमी पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाने दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
स्वत: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि गोपाल राय व सत्येंद्र जैन हे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी बेमुदत उपोषणावर आहेत. त्यातच आपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. पोलिसांनी तो ३ किमी आधीच रोखला.
मात्र नीति आयोगाच्या बैठकीसाठी आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे.
मात्र, आपल्याला याबाबत मोदींनी कोणतेही उत्तर दिले नाही,
असे बॅनर्जी यांनी सांगितले. आयएएस अधिकाºयांनी कामावर पुन्हा रुजू व्हावे, आम्ही त्यांना सुरक्षेची हमी
देतो. ते आमच्या परिवाराचाच
हिस्सा आहेत, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
>रविवारी आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाला परवानगी नसल्यामुळे मोदी यांच्या निवासस्थानापासून तीन किमी अंतरावर हा मोर्चा पोलिसांनी रोखला.
>दिल्लीतील आयएएस अधिकाºयांनी संप केल्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या आरोपाचा या अधिकाºयांच्या संघटनेने इन्कार केला आहे.
>केजरीवाल हे नक्षलवादी व ४२० आहेत. अण्णा हजारेंनी त्यांना जवळ केले, पण त्यांनी अण्णांनाच दूर सारले. अशा माणसावर विश्वास कसा ठेवायचा?
- सुब्रमण्यम स्वामी

Web Title: Delhi Tapali, four Chief Ministers of Kejri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.