नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केलं जातं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, आतापर्यंत 42 जणांना आंदोलनापायी जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी हिंसाचारातील पीडितांना मदत जाहीर केली आहे. हिंसेतील पीडितांना आम्ही मोठ्या प्रमाणात जेवण पोहोचवतो आहोत. ज्या लोकांची घरं आगी पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती केजरीवालांनी दिली आहे.या हिंसक आंदोलनात ज्यांची घरं पूर्णतः नेस्तनाबूत झाली आहेत, त्यांना पैशांची नितांत गरज आहे. उद्या शनिवारी अशा लोकांसाठी 25-25 हजार रुपये ऑन द स्पॉट देणार असल्याचं केजरीवालांनी जाहीर केलं आहे. त्यांचे उर्वरित पैसे दोन ते तीन दिवसांत निरीक्षकाकडून खातरजमा केल्यानंतर वितरीत करण्यात येतील, असंही केजरीवालांनी स्पष्ट केलं आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence : देशातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद अन् लोकशाही संपुष्टात, मित्रपक्षाकडून भाजपाला घरचा आहेरDelhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलंDelhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदनपाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ