नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्या(CAA)च्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीला संबोधित केलं. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए कायदा घेऊन आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा) डावे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमित शाह म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ज्यात मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल, अशा प्रकारच्याही अफवा आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधक खोटं बोलून लोकांना चिथावणी देत आहेत. गैरसमज निर्माण करून दंगली घडवल्या जात आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यानं मुस्लिम अल्पसंख्याकांचं नागरिकत्व जाणार नाही. लोकांचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणलेला नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी स्पष्ट केलं आहे. देशाच्या विभाजनादरम्यान हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी समुदायातील लोक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धर्माच्या आधारे विखुरले गेले होते. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवून देण्यासाठी हा कायदा आणला आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence : देशातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद अन् लोकशाही संपुष्टात, मित्रपक्षाकडून भाजपाला घरचा आहेरDelhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलंDelhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदनपाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ