Delhi Violence : जमावाला भडकविल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या इशरत जहां अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 03:20 PM2020-02-29T15:20:40+5:302020-02-29T15:22:08+5:30
पोलिसांनी आतापर्यंत 123 एफआयआर दाखल केल्या आहेत. तर 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसेची चौकशी करण्यासाठी दोन एसआयटी टीम स्थापन केल्या आहेत.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या माजी नगरसेविका इशरत जहां यांना दिल्ली पोलिसांनी हिंसा भडकवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. इशरत जहां यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मागील 50 दिवसांपासून इशरत दिल्लीतील खुरेजी परिसरात नागरिकता संशोधन कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होत्या.
गेल्या आठवड्यात रविवारी खुरेजी रोड जाम करण्यात इशरत यांचे नाव आले होते. सीएएविरुद्ध उत्तर पूर्व दिल्लीत अनेक ठिकाणी हिंसा भडकल्यानंतरही शनिवारी शांततापूर्व वातावरण होते. ज्या ठिकाणी अधिक हिंसा झाली, तिथे अजुनही लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसेत आतापर्यंत 42 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 123 एफआयआर दाखल केल्या आहेत. तर 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसेची चौकशी करण्यासाठी दोन एसआयटी टीम स्थापन केल्या आहेत. तसेच 24 फेब्रुवारीपासून उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसा प्रभावित भागात 7 हजारहून अधिक सुरक्षारक्षक तैणात करण्यात आले आहेत.