नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. हिंसाचारामुळे आतपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 150 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात सोमवारी तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी मृतांचा आकडा दहावर पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 जण जखमी झाले असून जीटीबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी देखील अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली.
भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सीएए विरोधी आंदोलनात पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. पेट्रोल पंप आणि काही गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले.
अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये द्वेष पसरवणारे संदेश, पोलीस आणि आमदारांमधील समन्वय, सुरक्षा बलांची तैनाती आणि अफवांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर मुख्यत्वेकरून चर्चा झाली. अमित शहा यांच्यासोबतची बैठक आटोपल्यावर केजरीवाल म्हणाले की, ''दिल्लीत उसळलेला हिंसाचार थांबावा असेच सर्वांना वाटते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात आज बोलावलेली बैठकही सकारात्मक झाली आहे. हा दिल्लीचा प्रश्न आहे आणि सर्वपक्षीय मिळून त्यासाठी प्रयत्न करू.''
महत्त्वाच्या बातम्या
अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!
Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या लेकीची शेरवानी 'या' मराठी डिझायनरने बनवली, पण...
Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा
धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर