नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना बुधवारी लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. मात्र आता सिसोदिया यांना आता डेंग्यू झाला असून त्यांच्या प्लेटलेट्स सातत्याने कमी होत असल्याची माहिती मिळत आहे.
मनीष सिसोदिया यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातून उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीचे 48 वर्षीय नेते मनीष सिसोदिया यांच्या शरीरातून ऑक्सिजनचा स्तर कमी झाला झाल्यामुळे आणि ताप असल्याने बुधवारी सायंकाळी साधारण चार वाजता त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता सिसोदिया यांना डेंग्यू झाला असून पुढील उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना 14 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. ट्विटरवरून त्यांनी याबाबत माहिती दिली होती. कोरोनाची लागण झाल्यामुळे मनीष सिसोदिया हे 14 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच्या एक दिवसीय सत्रात सहभागी होऊ शकले नाहीत. बुधवारी त्यांनी ट्विट करीत कोंडलीचे आमदार कुलदीप कुमार यांच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता
मनीष सिसोदिया यांना अधिक तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातील तापमान वाढत होते. तसेच, ऑक्सिजनचा स्तरही थोडा कमी झाला होता अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली होती. मनीष सिसोदिया यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. गरज पडल्यास ऑक्सिजन दिले जाऊ शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले होते. त्यानंतर आता सिसोदिया यांना डेंग्यू झाला असून त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी
बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप
क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ
'मी मास्क घालत नाही' म्हणणाऱ्या भाजपा नेत्याचा यू-टर्न, म्हणाले...; Video व्हायरल
"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन", राहुल गांधींचा घणाघात