नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'विकसित भारत @2047: Voice of Youth' पोर्टल लाँच करणार आहेत. या प्रसंगी, पंतप्रधान देशभरातील राजभवनांमध्ये आयोजित कार्यशाळेत विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना संबोधित करतील. राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे तयार करण्यात देशातील तरुणांना सक्रियपणे सहभागी करून घेणे हे पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट आहे.
देशासाठी राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे तयार करण्यात तरुण पिढीला सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे पंतप्रधान मोदींचे ध्येय आहे. या व्हिजनच्या अनुषंगाने, ‘Developed India@2047: Voice of Youth’ हा उपक्रम देशातील तरुणांना विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच विकसित भारत@2047 चे उद्दिष्ट आहे की भारताला 2047 पर्यंत, त्याच्या स्वातंत्र्याचे 100 वे वर्ष एक विकसित राष्ट्र बनवायचे आहे, असंही नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.