ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन’च्या अध्यक्षपदी ‘लोकमत’चे देवेंद्र दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:31 AM2020-09-12T00:31:40+5:302020-09-12T00:31:55+5:30
देवेंद्र दर्डा यांनी यापूर्वी आयएनएस व इफ्रामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे.
नवी दिल्ली : ‘ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन’च्या (एबीसी) अध्यक्षपदी ‘लोकमत माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची वर्ष २०२०-२०२१ साठी निवड करण्यात आली. भारतातील प्रादेशिक भाषांच्या माध्यमांत लोकमत माध्यम समूह अग्रणी असून, मुद्रित, डिजिटल, टीव्ही, इव्हेंटस्, अशा सर्वव्यापी माध्यम प्रकारांमध्ये आघाडीवर आहे.
देवेंद्र दर्डा यांनी यापूर्वी आयएनएस व इफ्रामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. त्याचबरोबर ते यवतमाळमधील विविध शिक्षण संस्थांचे अध्यक्षपद भूषवीत आहेत, तसेच ते वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये आहेत. एबीसीच्या उपाध्यक्षपदी आयटीसी लि.चे करुणेश बजाज यांची २०२०-२१ या वर्षासाठी निवड करण्यात आली.
एबीसीची २०२०-२१ ची व्यवस्थापन परिषद प्रकाशकांचे प्रतिनिधी
१) देवेंद्र दर्डा- लोकमत मीडिया प्रा.लि. (अध्यक्ष)
२) रियाद मॅथ्यू- मल्याळम मनोरमा कं.लि. (मानद सचिव)
३) होरमुसजी एन. कामा- द बॉम्बे समाचार प्रा.लि.
४) शैलेश गुप्ता- जागरण प्रकाशन लि.
५) प्रताप जी. पवार- सकाळ पेपर्स प्रा.लि.
६) प्रवीण सोमेश्वर- एचटी मीडिया लि.
७) मोहित जैन- बेनेट, कोलमन अँड कं. लि.
८) धुरबा मुखर्जी- एबीपी प्रा.लि.
जाहिरातदारांचे प्रतिनिधी
१) करुणेश बजाज- आयटीसी लि. (उपाध्यक्ष)
२) देवव्रत मुखर्जी- युनायटेड ब्रेवरीज लि.
३) अनिरुद्ध हलदार- टीव्हीएस मोटार कंपनी लि.
जाहिरात संस्थांचे प्रतिनिधी
१) विक्रम सखुजा, मॅडिसन कम्युनिकेशन्स प्रा.लि. (मानद खजिनदार)
२) शशिधर सिन्हा, मीडिया ब्रांडस् प्रा.लि.
३) श्रीनिवास के. स्वामी, आरके स्वामी बीबीडीओ प्रा.लि.
३) आशिष भसीन, डेन्टस्यू एजिस नेटवर्क कम्युनिकेशन्स इंडिया प्रा.लि.
होर्मुज मसानी- सरचिटणीस
लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांची एबीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या घटनेला दहा वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांची या पदावर निवड झाली आहे. यापूर्वी मल्याळम मनोरमा माध्यम समूहाचे के.एम. मॅथ्यू व अमित मॅथ्यू या पिता-पुत्रांनी हे पद भूषविले होते. त्यानंतर आता लोकमत माध्यम समूहातून अशी निवड होण्याचा योग आला आहे.