नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकझाल्यानंतर संरक्षण दलाच्या प्रमुखांनी आधी पाकिस्तानला याबाबत कळविले, नंतर प्रसारमाध्यमे, देशाला सांगितले. मात्र, यावर नाही सरकारचा कोणता मंत्री बोलला होता नाही पंतप्रधान. मात्र, त्याच दिवशी विरोधी पक्षांनी या स्ट्राईकवर संशय व्यक्त केला. आणि त्यांच्या आरोपांना वजन आणण्यासाठी पाकिस्तानच्या वक्तव्यांची मदत घेतली होती. तेच पाकिस्तानला हवे होते. या ऑपरेशनवेळी मी थेट संपर्कात होतो, असा खुलासा पहिल्यांदाच मोदी यांनी केला.
सर्जिकल स्ट्राईकच्या राजकीय मुद्द्यावर मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मोदी यांनी आपण सर्जिकल स्ट्राईकच्या राजकीय मुदद्दा बनविण्य़ाविरोधात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवेळी लाईव्ह संपर्कात असल्याची कबुली दिली.
पाकिस्तानला सांगितल्याशिवाय कोणालाही सांगणे उचित नव्हते. यामुळे मिडियाला जेव्हा बोलविण्यात आले तेव्हा मिडियामध्येही खळबळ उडाली होती. पाकिस्तान तर फोनच उचलत नव्हता. मी काय घोषणा करणार याबाबत मिडियाही संभ्रमात होती, असेही मोदी यांनी सांगितले.