नवी दिल्ली : कोरोनाशी लढा देत असताना थोडाही हलगर्जीपणा करु नका, पूर्वीपेक्षा अधिक सतर्क रहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना केले. मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीत बोलताना मोदी म्हणाले की, राज्यांसोबत समन्वय साधून लस वितरण करण्यासाठी रणनीती तयार करण्यात येईल. आरटीपीसीआर तपासणी वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केले. या बैठकीनंतर मोदी यांनी ट्वीट केले की, विविध मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. लोकांना लस देण्याच्या मुद्यावरही संवाद साधला.
राज्यांचे मत जाणून घेतल्यानंतर मोदी म्हणाले की, संकटाच्या या समुद्रातून आम्ही आता किनाऱ्याकडे वाटचाल करीत आहोत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात हलगर्जीपणा करु नका. ज्या देशात कोरोना कमी होत होता त्या देशात आता कोरोना वेगाने वाढत आहे. देशातील काही राज्यात परिस्थिती काळजी करण्यासाठी आहे. मोदी म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत त्याची गती वाढवावी लागेल. जे रुग्ण घरीच आहेत त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. लस बनविणारे आपले काम करत आहेत. मात्र, आम्हाला हलगर्जीपणा करुन चालणार नाही.
लेखी सूचना मागविल्याn कोरोना लसीच्या वितरणाबाबत रणनीती ठरविण्यासाठीही चर्चा करण्यात आली. आपल्या सूचना लिखित स्वरुपात देण्याचे आवाहन मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केले. n कोणत्या लसीवर किती खर्च येणार हे अद्याप निश्चित नाही, असे सांगून ते म्हणाले की, दोन भारतीय लसी यात आघाडीवर आहेत. आम्ही जागतिक कंपन्यांसोबतही काम करत आहोत. n देशातील मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयांना ऑक्सीजनबाबत आत्मनिर्भर करण्यात येईल. १६० पेक्षा अधिक नव्या ऑक्सिजन प्लांटची निर्माण प्रक्रिया सुरु आहे. पीएम केअर्समधून हजारो नवे वेंटिलेटर्स देण्यात येणार आहेत. यांची होती उपस्थिती n या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सहभाग घेतला.