नवी दिल्ली : मीडिया कमिटीने प्रमाणपत्र दिल्याशिवाय नमो टीव्हीवरून कोणत्याही कार्यक्रमांचे प्रक्षेपण न करण्याची ताकीद दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिले आहेत. या संदर्भात एक पत्र भाजपला पाठविण्यात आले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच नमो टीव्हीवर प्रसारित करण्यात येणाºया सर्व कार्यक्रमांसाठी मीडिया सर्टीफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीचे प्रमाणपत्र आधी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी याबातचे पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे, या टीव्हीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी दोन अधिकाºयांची नेमणूकही केली आहे. नमो टीव्ही हा नमो अॅपचा भाग असल्याचा खुलासा भाजपाने निवडणूक आयोगाकडे केला होता. कॉँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवाल मागविला होता. तसेच नमो टीव्हीवर प्रमाणपत्राशिवाय असलेला सर्व मजकूर तत्काळ हटविण्याचे आदेश दिले होते.
प्रमाणपत्राशिवाय कार्यक्रमांचे प्रक्षेपण नको, नमो टीव्हीला आयोगाची ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 3:35 AM