२३७ किलो ते १७७ किलो... जगातील सर्वात लठ्ठ मुलावर दिल्लीत सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 02:29 PM2018-07-03T14:29:09+5:302018-07-03T14:38:07+5:30
सर्जरीपूर्वी त्याचे वजन 237 किलो एवढे होते.
नवी दल्ली - येथील एका खासगी रुग्णालयात काल रात्री जगातील सर्वात लठ्ठ मुलाचे ऑपरेशन झाले. 14 वर्षीय मिहिर जैन असे त्या मुलाचे नाव असून आता त्याचे वजन 177 किलो झाले आहे. सर्जरीपूर्वी त्याचे वजन 237 किलो एवढे होते. दिल्लीच्या मिहिरची दोन महिन्यापूर्वी मॅक्स रुग्णालयात सर्जरी झाली होती. दोन महिन्यानंतर आज रुग्णालयाने याची माहिती दिली आहे. मॅक्स हॉस्पिटलचे सीनियर बॅरियाट्रिक सर्जन डॉ. प्रदीप चौबे यांनी मिहिरवर सर्जरी केली.
5 वर्षात 60 किलोचा झाला -
जन्मावेळी मिहिर जैन इतर सामान्य मुलांप्रमाणेच होता. प्रेग्नेंसी दरम्यान त्याच्या आईला कोणताही त्रास झाला नाही. जन्मावेळी त्याचे वजन 2.5 kg होते. मिहिर जैन दोन वर्षांचा होईपर्यंत त्याच्यात कोणताही अनोखा बदल दिसला नाही. त्यानंतर मात्र अचानक त्याचे वजन वाढायला लागले. पाच वर्षापर्यंत त्याचे वजन 60 किलोपर्यंत वाढले होते. त्याचे वजन अनियंत्रित होत वाढू लागले. यामुळे त्याच्या आई-वडिलांची चिंताही वाढू लागली.
शाळाही सोडली -
वाढत्या वजनामुळे मिहिरला चालता येत नव्हते. स्वतःचा तोल सांभाळू शकत नसल्यामुळे त्याला रोज शाळेत जाणे जमत नव्हते. परिणामी दुसरीनंतर त्याने शाळा सोडली. दोन पावलं चालले तरी त्याला थकवा जाणवू लागला.
10 इंच फॅट -
मिहिर जैनच्या अंगावर दहा ते 12 इंच फॅट जमा झाले होते. त्यामुळे सर्जरी करताना डॉक्टरांना अडचण येत होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन पूर्वी क्रॅश डाएट प्लान दिला होता.