अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ट्रम्प जगप्रसिद्ध ताजमहाल पाहणार आहेत. मात्र, असे असले तरीही त्यांचा ताजमहाल पाहण्याची इच्छा अधुरीच राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मोडावा लागण्याची शक्यता आहे. सीआयएने मोदी यांना मोठ्या पेचामध्ये अडकवले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी परदेशात फिरण्यासाठी दी बिस्ट ही अभेद्य लिमोझिन वापरली जाते. त्यांना अन्य कोणत्याही कारचा वापर करण्याची परवानगी नाही. यामुळे सीआयए अन्य कोणत्याही वाहनातून ट्रम्प यांना ताज महाल पाहण्यासाठी नेणार नाही. तर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार इंधनावर चालणारी कोणतीही कार किंवा वाहन ताज महालच्या 500 मीटरच्या परिसरात नेण्यास बंदी आहे.
तर ट्रम्प यांची दी बिस्ट ही कार सीआयएला ताज महालच्या गेटवर न्यायची आहे. सध्या पर्यटक गोल्फ कार्टमधून ताजमहालाच्या उजव्या बाजुच्या दरवाजावर जातात. भारत सरकारने ट्रम्प यांना हीच गोल्फ कार्ट वापरण्याची परवानगी दिली आहे. मात्र, सीआयएला हे मान्य नाही.
जगातील सर्वांत सुरक्षित कार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची; कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही
असा पेच मोदींसमोर 2015 मध्येही आला होता. तेव्हा बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. याच कारणामुळे ओबामा यांना ताज महालला भेट देण्याचा प्लॅन रद्द करावा लागला होता. सीआयएने सुरक्षेचे कारण पुढे करून गोल्फ कार्टने जाणे नाकारले होते.