नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं जोरदार स्वागत केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प देखील भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत भारतीयांच्या मनात कुतुहल आहे. तसेच काहीसं कुतूहल हे अमेरिकेतील लोकांच्या मनात देखील आहे.
अमेरिकेतील लोकांनी भारत दौऱ्यासंदर्भातील अनेक गोष्टी या गुगलवर सर्च केल्या आहेत. गेले दोन दिवस #DonaldTrumpIndiaVisit, #IndiaWelcomesTrump #DonaldTrump, #TrumpIndiaVisit यासारखे अनेक हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्यासाठी भारतीय नेटीझन्स प्रयत्नशील आहेत. डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी आणि मुलगीबाबत भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतही भारताबद्दल अनेक गोष्टी सर्च करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेमध्ये 24 फेब्रुवारीला 'What Is India' आणि 'Where Is India' या दोन गोष्टी ट्रॉप ट्रेंडमध्ये होत्या. तेथील लोकांनी what is India? म्हणजेच भारत काय आहे? आणि where is India? म्हणजेच भारत नक्की कुठे आहे? या दोन गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या आहेत. तसेच अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअममध्ये नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे अमेरिकेतील लोकांनी नमस्तेचा अर्थ देखील शोधला आहे.
25 फेब्रुवारीला अमेरिकेत भारताचा नकाशा, भारताची लोकसंख्या, ताजमहाल कुठे आहे?, भारताची राजधानी हे टॉपिक्स ट्रेंडींगमध्ये होते. भारतामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव काय?, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे नाव काय?, इवांका यांचे वय किती आहे?, POTUS काय आहे ?, मेलानिया ट्रम्प यांचे वय किती आहे?, डोनाल्ड ट्रम्प यांचे वय किती? हे प्रश्न सर्वाधिक सर्च करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ज्यात तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला लगाम घालणं आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. भारताचा हा अभूतपूर्व दौराही कधी विसरणार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच त्यांनी भारतीयांनी केलेल्या शानदार स्वागतासाठी आभारही व्यक्त केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence : दिल्लीत हिंसाचाराची धग कायम; 10 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी
अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!
Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या लेकीची शेरवानी 'या' मराठी डिझायनरने बनवली, पण...
Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा
धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...