ठळक मुद्देअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारत-अमेरिकेतल्या 3 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोललो. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे अशी त्यांची इच्छा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारत-अमेरिकेतल्या 3 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे दिल्लीत सीएएवरून उसळलेल्या हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोललो. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे अशी त्यांची इच्छा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर परिश्रम घेतले आहेत.त्या मुद्द्यावरून त्यांच्यावर वैयक्तिक टीका झाल्याचं मी ऐकले, परंतु मी त्यावर चर्चा केली नाही. त्यांचा हा अंतर्गत विषय असून, या सर्व गोष्टी भारतावर अवलंबून आहेत.मी लवकरच भारत सोडून परत अमेरिकेला जाणार आहे. ते त्यांच्या लोकांसाठी योग्य निर्णय घेतील. मी या विषयावर आणखी बोलू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.तसेच त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरही मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. काश्मीर ही भारत आणि पाकिस्तानमधील एक मोठी समस्या आहे, मोदी त्या समस्येवर काम करत आहेत. आमच्यात आज याबद्दल बरेच बोलणं झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी माझे खूप चांगले संबंध असल्याने मला जर या विषयात मध्यस्थी करण्यास सांगितल्यास मी नक्कीच करेन.काश्मीर हा बराच काळ लोकांच्या दृष्टीने एक न सुटलेला विषय आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आम्ही आज दहशतवादाविषयी चर्चा केली. व्यापार संबंधांवर ट्रम्प म्हणाले, आमच्याकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात आहे. मला वाटते की, भारताशी करार करताना सर्वच गोष्टींचा विचार व्हायला हवा.हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकली भारत आमच्याकडे पाठवतो, तेव्हा भारताला आम्ही भारी आयात शुल्क देतो. परंतु भारतात जेव्हा आम्ही एखादी वस्तू निर्यात करतो, तेव्हा असं होत नाही. त्यामुळे त्यावर एक तोडगा निघण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!
Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा
धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर
Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...