दाट धुक्याने आग्रा एक्सप्रेस-वेवर डझनावर वाहनं एकमेकांना धडकली; पेरीफेरल एक्सप्रेस-वेवरही मोठा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:37 AM2023-12-27T11:37:38+5:302023-12-27T11:39:29+5:30
...परिणामी यामुळे अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
दिल्ली - एनसीआरसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशातही दाट धुके पसरले आहे. यामुळे रस्त्यांवरील व्हिजिबिलिटी अत्यंत कमी झाली आहे. रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसला आहे. रस्त्यावर वाहने चालवताना ड्रायव्हर्सना प्रचंड त्रास होत आहे. परिणामी यामुळे अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे उन्नावमधील आग्रा लखनऊ एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात घडला आहे. धुक्यामुळे एका पाठोपाठ 3 बसेस, एक ट्रक आणि 2 कारसह 6 वाहने एकमेकांवर आदळली. ही वाहने लखनऊवरून आग्र्याच्या दिशेने जात होती.
डबल डेकर बस डिव्हायडरवर आदळली -
धुक्यामुळे एक डबल डेकर बस अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकल्याचीही घटना घडली आहे. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास दोन डझन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि यूपीडा कर्मचाऱ्यांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. यांपैकी 6 प्रवाशांची प्रकृती अधिक गंभी आहे. त्यांना ट्रॉमा सेंटर लखनऊ येथे हलवण्यात आले आहे.
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेस-वेवर दोन जमांचा मृत्यू, अनेक जखमी -
बागपथमध्ये ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवरील घटनेत 2 दणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झाले आहेत. येथे रात्री उशिरा बस आणि ट्रकची धडक झाली. बसमधील सर्वच्या सर्व 13 प्रवासी जखमी झाले आहेत. हे लोक पंजाबवरून वृंदावन येते जात होते. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करणअयात आले आहेत. तर एका महिलेला हायर सेंटरला रेफर करण्यात आले आहे.