शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

दाट धुक्याने आग्रा एक्सप्रेस-वेवर डझनावर वाहनं एकमेकांना धडकली; पेरीफेरल एक्सप्रेस-वेवरही मोठा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:37 AM

...परिणामी यामुळे अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

दिल्ली - एनसीआरसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशातही दाट धुके पसरले आहे. यामुळे रस्त्यांवरील व्हिजिबिलिटी अत्यंत कमी झाली आहे. रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसला आहे. रस्त्यावर वाहने चालवताना ड्रायव्हर्सना प्रचंड त्रास होत आहे. परिणामी यामुळे अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे उन्नावमधील आग्रा लखनऊ एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात घडला आहे. धुक्यामुळे एका पाठोपाठ 3 बसेस, एक ट्रक आणि 2 कारसह 6 वाहने एकमेकांवर आदळली. ही वाहने लखनऊवरून आग्र्याच्या दिशेने जात होती.

डबल डेकर बस डिव्हायडरवर आदळली -धुक्यामुळे एक डबल डेकर बस अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकल्याचीही घटना घडली आहे. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास दोन डझन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि यूपीडा कर्मचाऱ्यांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. यांपैकी 6 प्रवाशांची प्रकृती अधिक गंभी आहे. त्यांना ट्रॉमा सेंटर लखनऊ येथे हलवण्यात आले आहे. 

ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेस-वेवर दोन जमांचा मृत्यू, अनेक जखमी -बागपथमध्ये ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवरील घटनेत 2 दणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झाले आहेत. येथे रात्री उशिरा बस आणि ट्रकची धडक झाली. बसमधील सर्वच्या सर्व 13 प्रवासी जखमी झाले आहेत. हे लोक पंजाबवरून वृंदावन येते जात होते. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करणअयात आले आहेत.  तर एका महिलेला हायर सेंटरला रेफर करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्लीDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस