DRDO चं अँटी कोविड औषध 2-DG कधी येणार बाजारात, किती असेल किंमत?; डॉ. रेड्डीजनं दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 12:10 PM2021-05-20T12:10:57+5:302021-05-20T12:14:42+5:30
DRDO 2G Anti Covid Drug: डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं DRDO च्या अँटी कोविड 2-DG औषधाबद्दल काही माहिती दिली आहे. एजन्ट्स आणि बनावट मेसेजेसपासून सावध राहण्याचं डॉ. रेड्डीजनं केलं आवाहन
हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅब्सनं DRDO च्या अँटी कोरोना औषध 2-DG बाबत काही माहिती जारी केली आहे. भारतात अँटी कोरोना औषध 2-DG ला आपात्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे औषध डॉ. रेड्डीज लॅब आणि DRDO च्या INMAS नं एकत्रित विकसित केलं आहे. 2-DG हे एकप्रकारचं ओरलं अँटी व्हायरल औषध आहे. याचा वापर केवळ रुग्णालयात दाखल असलेल्या मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांलर डॉ. सल्ल्यानुसार केला जाऊ शकतो, असं डॉ. रेड्डीजनं म्हटलं.
Dr. reddys नं दिलेल्या माहितीनुसार 2DG Drug ड्रग अद्याप बाजारात उपलब्ध करण्यात आलेलं नाही. हे औषध जून महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यतचा आहे. त्यापूर्वी येणाऱ्या कोणत्याही संदेशापासून सावध राहण्याचं आवाहन डॉ. रेड्डीज लॅबकडून करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियावर करण्यात येणारे दावे खोटे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
किती असेल किंमत?
या औषधाची किंमत किती असेल याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. येणाऱ्या काळात याची किंमत ठरवली जाईल. तसंच याची किंमत सामान्य लोकांना परवडेल अशीच ठेवली जाईल आणि लवकरच किंमतीची घोषणा केली जाऊ शकते, असंही त्यांनी नमूद केलं.
Dr Reddy’s releases important information regarding drug 2-deoxy-D-glucose (2DG), developed by INMAS, a DRDO lab in collaboration with Dr. Reddy’s Laboratories#COVID19pic.twitter.com/yXz0wPzeev
— ANI (@ANI) May 19, 2021
एजन्टपासून सावध राहा
2DG बाबत सांगताना डॉ. रेड्डीजनं एजन्ट्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. काही जण 2DG Drug च्या नावानं बनावट आणि अवैध औषधांची विक्री करत आहेत. यासोबतच सोशल मीडिया आणि WhatsApp वर 2DG संदर्भात येत असलेल्या मेसेजेसपासूनही सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. याशिवाय या औषधाचं कमर्शिअल लाँच आणि मोठ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयातील पुरवठा जून महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता असल्याचंही डॉ. रेड्डीजकडून सांगण्यात आलं.