महाराष्ट्रातील दुष्काळ राज्यसभेत
By Admin | Published: November 28, 2014 12:07 AM2014-11-28T00:07:17+5:302014-11-28T00:07:17+5:30
शिवसेनेचे ज्येष्ठ खा. राजकुमार धूत यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला.
नवी दिल्ली : शिवसेनेचे ज्येष्ठ खा. राजकुमार धूत यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला. मराठवाडय़ासह विदर्भातील टंचाईग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. या भागांत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा यांची तीव्र टंचाई आहे. दुष्काळी भागात शेतक:यांच्या हाती पीकही फारसे लागणार नाही याकडे खा. धूत यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
शून्य प्रहरात हा विषय धूत यांनी उपस्थित केला. धूत यांनी सांगितले की, राज्यातील 39134 खेडय़ांपैकी 1969 खेडय़ांमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. औरंगाबाद विभागातील 8 हजार, अमरावती विभागातील 7241 आणि नागपूर विभागातील 2क्29 व उर्वरित अन्य विभागातील खेडय़ांचा त्यात समावेश आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागांतील शेतक:यांच्या हाती पीकही नगण्य असेल म्हणून हे भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हायला हवे होते परंतु तसे झालेले नाही. या भागांना तातडीने मोठय़ा प्रमाणावर मदत हवी असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर संसाधनांची गरज असल्याचे धूत म्हणाले.
दुष्काळग्रस्त भागांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी केंद्राकडून प्राधान्याने निधी मिळणो ही काळाची गरज आहे, असे सांगून धूत यांनी यासंदर्भात मी कृषीमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असे सांगितले.
या गंभीर विषयात तातडीने वैयक्तिक लक्ष घालून या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त ग्रामीण लोकांना व मुक्या जनावरांना मदत म्हणून महाराष्ट्राला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन राजकुमार धूत यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी केले.