अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेणार - प्रेम वत्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 04:41 AM2020-06-03T04:41:13+5:302020-06-03T04:41:30+5:30
सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल.
मुंबई : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत आलेली मंदी तात्पुरती असून, लॉकडाऊन संपताच अर्थव्यवस्था परत भरारी घेईल, असे भाकीत कॅनेडियन गुंतवणूकदार व उद्योगपती प्रेम वत्स यांनी केले आहे.
सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही वत्स म्हणाले. बंगळुरू विमानतळाबाबत वत्स म्हणाले, सध्या आम्ही तिथे दुसरी धावपट्टी बांधतो आहोत व नव्या टर्मिनल बिल्डिंगचा प्रस्ताव आहे. गेल्यावर्षी एकही विमानतळ मिळाले नाही. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत वत्स म्हणाले, पॅकेजचा उपयोग अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.
लॉकडाऊननंतर भारतात गुंतवणूकदारांसाठी अनेक नवी क्षेत्रे खुली होणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची विकासक्षमता परत येणार आहे, असेही फेअर बॉक्स फायनान्शियल होल्डिंग्जचे अध्यक्ष असलेले वत्स म्हणाले.
फेअरफॅक्सने भारतात सध्या इंडिया इन्फोलाईन लिमिटेड, सीएसबी बँक, थॉमस कुक व बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊननंतर जी नवी उद्योगक्षेत्रे उदयाला येतील त्यात आम्हीही गुंतवणूक करू, असेही वत्स म्हणाले.