इंडियन मल्टीनॅशनल एज्युकेशनल टेक्नोलॉजी कंपनी BYJU'S चे सीईओ रवींद्रन बायजू (Raveendran Byju) यांच्या अडचणी वाढतच चाल्या आहेत. यासंदर्भात बोलताना ईडीकडून सांगण्यात आले आहे की, शनिवारी एज्युकेशन टेक्नोलॉजी सेक्टरमधील मोठी कंपनी बायजूजचे सीईओ (CEO) रवींद्रन बायजू यांच्या बेंगलोर येथील ऑफिस आणि रेसिडेंशिअल परिसरात छापेमारी करण्यात आली आणि तेथून काही ‘आक्षेपार्ह’ दस्तऐवज और डिजिटल डाटा जप्त करण्यात आला आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत तीन परिसरांत छापेमारी करण्यात आली आहे. यात दोन व्यावसायिक आणि एका निवासी ठिकानाचा समावेश आहे.
ही कारवाई बायजू रवींद्रन आणि त्यांची कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकानांवर करण्यात आली. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत त्यांनी विविध आक्षेपार्ह दस्तऐवज आणि डिजिटल डाटा जप्त केला आहे. तसेच, ही कारवाई काही लोकांकडून आलेल्या विविध तक्रारींच्या आधारे करण्यात आली आहे. यापूर्वी रवींद्रन बायजू यांनी अनेक वेळा समन पाठवण्यात आले होते. मात्र ते कधीही ईडी समोर आले नाही, असेही तपास यंत्रनेने म्हटले आहे.
रवींद्रन बायजू यांची कंपनी ‘थिंक एंड लर्न प्रायव्हेट लिमिटेड’ला 2011 ते 2023 दरम्यान थेट परकीय गुंतवणुकीच्या (FDI) माध्यमाने जवळपास 28,000 कोटी रुपये मिळाले. तसेच, कंपनीनेही याच काळात थेट परकीय गुंतवणुकीच्या नावे, विविध परदेशी प्राधिकरणांना सुमारे 9,754 कोटी रुपये पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.